१३२ वर्षांनंतरही ‘डोंबिवली फास्ट’ची प्रतीक्षा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-May-2019
Total Views |



डोंबिवली : १ मे रोजी डोंबिवली स्थानकाला सुमारे १३२ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, या स्थानकातून प्रवास करणार्‍या प्रवाशांची डोंबिवली फास्टची मूळ मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही. डोंबिवली शहर झपाट्याने विकसित होत असून येथील नोकरदारवर्गाची दिनचर्या रेल्वेच्या घड्याळावर अवलंबून आहे. येथील वाढती गर्दी प्रवाशांच्या जीवावर बेतत असूनही रेल्वे प्रशासन मात्र तात्पुरत्या उपायावर संतुष्ट असल्याचं चित्र कायम दिसून येते.

 

सर्वाधिक गर्दीचे स्थानक म्हणून चर्चित असलेल्या डोंबिवली स्थानकाची १ मे, १८८७ रोजी स्थापना करण्यात आली. १ मे रोजी या स्थानकास १३२ वर्षे पूर्ण झाली आहेत. या स्थानकाला वायफाय, नव्याने होणारा रेल्वेपूल व अद्यावत स्कायवॉकची झळाळी प्राप्त होत आहे. शहराचे बदलते रूप लक्षात घेता डोंबिवली रेल्वेस्थानकाच्या कायापालटाच्या कामाला रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून वेग आला आहे. रेल्वेस्टेशनवर अद्यावत एस्केलेटर व इतर काही अद्यावत सुविधा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. मात्र, या स्थानकातील गर्दी वाढतच जात आहे.

 

नव्याने होणारे रेतीबंदर ते माणकोली पूल हे ठाण्याकडे जाण्यासाठी सोयीस्कर ठरणार असले तरी मुंबईचा प्रवास करण्यासाठी येथील प्रवाशांना रेल्वेच सोयीस्कर पर्याय आहे. दरम्यान याच धर्तीवर डोंबिवली फास्ट होणे अपेक्षित आहे. सकाळच्या व सायंकाळच्या सुमारासतरी एखादी डोंबिवली फास्ट व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@