प्रियांका गांधींविरोधात बाल हक्क आयोगाची तक्रार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-May-2019
Total Views |




नवी दिल्ली : कॉंग्रेसच्या महासचिव प्रियांका वाड्रा-गांधी यांच्याविरोधात राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. काही दिवसांपूर्वी प्रियांका गांधींसमोर लहान मुले पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात अपशब्द उच्चारल्याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. याबद्दल आक्षेप घेत प्रियांका गांधींविरोधात तक्रार करण्यात आली आहे.

 

प्रियांका गांधी कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या प्रचारानिमित्त अमेठी लोकसभा मतदार संघात प्रचार करत होत्या. त्यावेळी एका मुलांच्या घोळक्याशी त्या बोलत होत्या. मुलांनी कॉंग्रेसच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. मात्र, त्यावेळी पंतप्रधानांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले. जोपर्यंत मुले काही आक्षेपार्ह वक्तव्य करत नाहीत तोपर्यंत प्रियांका गांधी त्यांच्याकडे पाहत हसत होत्या. मात्र, मुलांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर त्यांनी मुलांना रोखले होते.

 

मात्र, आता या व्हायरल व्हिडिओवर आक्षेप घेत बाल हक्क आयोगाने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे निवडणूक आयोग आता काय भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तूळाचे लक्ष आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@