वर्ल्ड पासवर्ड डे : तुम्ही हा पासवर्ड वापरत नाहीना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-May-2019   
Total Views |


डिजिटल दुनियेत प्रत्येक वेबसाईट, अॅप वापरण्यासाठी लॉगिन आणि पासवर्डची आवश्यकता असते. तर जाणून घ्या आज वर्ल्ड पासवर्ड डे दिनानिमित्त काही टीप्स... जर तुम्ही तुमचा पासवर्ड बॉन्ड007, एबीसी123, फुटबॉल, क्रिकेट, हॉकी असा ठेवला आहे. याव्यक्तिरीक्त फ्लॉवर, लक, लव्ह, असे शब्द वापरात आहेत. तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. तुमचा पासवर्ड सहज हॅक केला जाऊ शकतो, अशी सूचना रिझर्व्ह बॅंक इन्फोर्मेशनतर्फे (आयबीटी) जारी केली आहे. आयबीटी ही आरबीआयद्वारे सायबर सुरक्षेसाठी स्थापन केलेली एक संस्था आहे.

 

आयबीटीच्या अहवालानुसार, ८१ टक्के प्रकरणांमध्ये पिनकोड आणि पासवर्ड दुसऱ्यांचे वापरण्यात आलेले असतात किंवा सहज हॅक केले जातील, असे असतात. एक व्यक्ती बऱ्याच ठिकाणी सारखाच पासवर्ड वापरत असल्याने हॅकींगच्या घटना घडत असतात, असे सायबर तज्ज्ञांचे मत आहे. बऱ्याचदा अनेक पासवर्ड लक्षात ठेवण्याची अडचण नको म्हणून एकच पासवर्ड सर्व ठिकाणी वापरला जातो. काहीजण पासवर्ड लक्षात न लिहून ठेवतात आणि फसवणूकीचे प्रकार घडतात.

 

हॅकर्स उठवतात फायदा

बॅंक ग्राहकांच्या या चुकांमुळे हॅकर्स या संधीचा फायदा घेतात आणि ग्राहकांची माहिती मिळवत अनेक जणांना गंडा घालतात. त्यांना विशेषतः बिझनेस अकाऊंट किंवा व्यावसायिकांची खाती हॅक करण्यात विशेष रस असतो. त्यामुळे कोट्यवधी रुपयांवर ते सहज डल्ला मारू शकतात.

असा बनवा पासवर्ड

अनेक कंपन्या बॅंका आपल्या ग्राहकांना त्यांचा पासवर्ड अधिक सुरक्षित बनवण्याचे आवाहन करतात. तुमचा पासवर्ड फक्त तुम्हालाच माहीती असेल याची काळजी घ्या. पासवर्ड तयार करताना त्यात अक्षर अंक आणि एक स्पेशल कॅरेक्टरचा सामावेश अवश्य करा. बायोमॅट्रीक पासवर्ड, टु स्टेप व्हेरिफीकेशन असे पर्याय वापरणे अधिक सोयीचे ठरेल.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@