क्रूरकर्मा बगदादी जिवंत?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-May-2019
Total Views |




अबू बक्र अल बगदादीचा जन्म 28 जुलै,1971 साली इराकमधील सलाद्दिनमध्ये झाला. बगदादीचे खरे नाव इब्राहिम अव्वाद इब्राहिम अल-बद्री. बगदादीने इस्लामिक स्टडीजमध्ये ‘डॉक्टरेट’ पदवी मिळवली असून तो स्वतःला प्रेषित महंमद पैगंबरांचा वंशजही म्हणवतो.

 

इस्लामिक स्टेट ऑफ इराक अ‍ॅण्ड सीरिया’ म्हणजेच ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबू बक्र अल बगदादीचा एक कथित व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. तब्बल पाच वर्षांनंतर त्याचा व्हिडिओ समोर आल्याने माणुसकीचा दुश्मन, क्रूरकर्मा बगदादी अद्याप जिवंत असल्याच्या चर्चा रंगवल्या जात आहेत. या कथित व्हिडिओनंतर लगेचच बगदादीची एक कथित ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली होती. या कथित व्हिडिओची आणि ऑडिओ क्लिपची सत्यता तपासली नसल्याने नेमका हा व्हिडिओ कधीचा आहे? यातील व्यक्ती ही बगदादीच आहे का? असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांपासून जगभरातील तपास यंत्रणांना पडले आहेत. श्रीलंका साखळी बॉम्बस्फोट हल्ल्याची जबाबदारी ‘इसिस’ने स्वीकारल्यानंतर लगेचच बगदादीचा व्हिडिओ समोर आल्याने यासंबंधी अनेक मुद्दे चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. कारण, 2014 साली बगदादीचा शेवटचा व्हिडिओ समोर आला होता. यादरम्यानच्या काळात अनेक घडामोडी घडल्या. 2015 साली बगदादीचा हवाई हल्ल्यात मृत्यू झाल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर सीरिया व इराकमध्ये ‘इसिस’चा पाडाव झाला होता. यामुळे जगभरातून ‘इसिस’चे अस्तित्व संपल्यातच जमा होते. मात्र, श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोट घडवून आम्ही सैतान अजूनही जिवंत असल्याचाच इशारा ‘इसिस’ने जगाला दिला आहे.

 

अबू बक्र अल बगदादीचा जन्म 28 जुलै,1971 साली इराकमधील सलाद्दिनमध्ये झाला. बगदादीचे खरे नाव इब्राहिम अव्वाद इब्राहिम अल-बद्री. बगदादीने इस्लामिक स्टडीजमध्ये ‘डॉक्टरेट’ पदवी मिळवली असून तो स्वतःला प्रेषित महंमद पैगंबरांचा वंशजही म्हणवतो. अमेरिकेच्या इराकमधील तुरूंग छावणीत त्याने चार वर्ष शिक्षा भोगली आहे. या कैदेत असताना तो इतर दहशतवाद्यांशी आपला संपर्क वाढवत होता. अखेर 2009 साली अमेरिकेने त्याला सोडून दिले. या दरम्यानच्या काळात इराकमध्ये सद्दाम हुसेनची अखेरची गणती सुरू होती. अखेर सद्दामच्या पाडावानंतर निर्माण झालेल्या अराजकाचा फायदा घेत, बगदादीने धर्माच्या नावाने हाक देत 2013 साली ‘इसिस’ची स्थापना केली. या कामासाठी सुरुवातीला बगदादीला ‘अल कायदा’ या दहशतवादी संघटनेने मदत केली. मात्र, नंतरच्या काळात ‘इसिस’ आणि ‘अल कायदा’ वेगळे झाले. स्थापनेनंतर लगेचच ‘इसिस’ने आपण जगातील सर्वात क्रूर दहशतवादी संघटना असल्याचे आपल्या क्रौयातून दाखवायला सुरुवात केली. अखेर 29 जून, 2014 मध्ये बगदादीने इराक आणि सीरियाच्या बहुतांश भागांवर ताबा मिळवला आणि ‘इस्लामिक स्टेट’ (आयएस)ची घोषणा केली. एवढंच नाही तर त्याने स्वत:ला ‘मुस्लिमांचा खलिफा’ म्हणून घोषित केले.

 

आज या संघटनेचे जवळपास 10 हजार सदस्य असल्याचे बोलले जाते. विशेष म्हणजे, ही जगातील सर्वात श्रीमंत दहशतवादी संघटना असून या संघटनेचे वार्षिक दोन अरब कोटी रुपयांचे बजेट आहे. ‘इसिस’चा इराक, सीरिया, लिबिया, उत्तर आफ्रिकेतील देशांपासून ते नायजेरियापर्यंत वावर आहे. सध्या ‘इसिस’चा डोळा दक्षिण आशियावर असून यात प्रामुख्याने भारत, श्रीलंका, अफगाणिस्तान व बांगलादेशचा समावेश आहे. 2014 मध्ये इराक आणि सीरियावर कब्जा मिळवत ‘इस्लामिक स्टेट’ची घोषणा केल्यानंतर ‘इसिस’चे क्रूर व अमानवी कृत्य जगासमोर आले होते. याच कारणाने अमेरिकेने बगदादीला ‘मोस्ट वॉण्टेड दहशतवादी’ घोषित करत त्याच्यावर 25 दशलक्ष डॉलरचे बक्षीस ठेवण्यात आले होते. त्यानंतर बगदादी 2014 मध्ये मोसूल शहरात शेवटचा दिसला होता, तर 2015 साली सीरियातील रक्काजवळ रशियन सैन्याच्या हवाई हल्ल्यात बगदादीचा खात्मा झाल्याची माहिती रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिली होती. मात्र, त्यानंतरही अनेक वेळेस बगदादीच्या कथित ऑडिओ क्लिप व्हायरल करण्यात आल्या होत्या, तर इराकी सैन्याने बगदादी जिवंत असल्याचा दावाही केला होता. काही वृत्तपत्रांनी बगदादी जिवंत असून तो जखमी आहे, अशा मथळ्याखाली बातम्याही दिल्या होत्या. अखेर पुन्हा एकदा या क्रूरकर्म्याची व्हिडिओ क्लिप समोर आली असून बगदादीच्या मृत्यूबाबत पुनश्च संभ्रम निर्माण झाला आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@