पाकिस्तानात महागाईचा भडका, किंमती ऐकाल तर अवाक व्हाल!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-May-2019
Total Views |




कराची : पाकिस्तानची आर्थिक स्थिती खालावल्याने देशात महागाईचा भडका उडालाय. डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानचा रुपया आणखीन घसरला असून एका डॉलरची किंमत १४८ रुपये झाली आहे. यामुळे खाद्य पदार्थ व जीवनावश्यक वस्तूंचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर गेले आहेत.

 

ब्लूमबर्गच्या आवाहलानुसार, आशियामधील इतर १३ चलनांच्या तुलनेत पाकिस्तानच्या चलनाने न्यूनतम पातळी गाठली आहे. तब्बल २० टक्के घसरण झाल्याचे समोर आले आहे. यामुळे पाकिस्तानमधील खरेदी सर्वसामान्यच्या खिशाला परवडणारी राहिली नसून एक डझन संत्रे ३६० रुपये किलो, लिंबू आणि सफरचंद ४०० रुपये प्रति किलो विकले जात आहेत. तर १५० रुपये डझन केळी, ११०० किलो मटण, ३२० रुपये चिकन, आणि १२० ते १८० रुपये लिटर दराने दुधाची विक्री करण्यात येत आहे.

 

रमझानच्या पवित्र महिन्यात पाकिस्तानमधील नागरिकांना जीवनावश्यक गोष्टींची खरेदी करणं महाकठीण काम होऊन बसलं आहे. यामुळे येथील नागरिक सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानातील या आर्थिक आणीबाणीवर आवाज उठवत आहेत. महागाई सरकारच्या हाताबाहेर गेली असून सरकारने यासाठी योग्य ती पावले उचलावीत असेजही काही नागरिकांचं म्हणणं आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@