'द झोया फॅक्टर' चित्रपटाच्या प्रदर्शनामध्ये विलंब

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-May-2019
Total Views |


अभिषेक शर्मा दिग्दर्शित
'द झोया फॅक्टर' हा चित्रपट येत्या १४ जून ला प्रदर्शित होणार होता. मात्र आता सोनम कपूर आणि दूलकर सलमान यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे चित्रपटाच्या बदलेल्या वेळापत्रकानुसार साधारण क्रिकेट वर्ल्ड कप च्या आधी म्हणजेच सप्टेंबरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. 

एकीकडे हा चित्रपट क्रिकेटवर आधारित असल्यामुळे बॉक्स ऑफिसचा विचार करून चित्रपटाची तारीख पुढे ढकलण्यात आल्याचा अंदाज व्यक्त होत आहे तर काही जण चित्रपटाचे काम अपूर्ण असल्यामुळे चित्रपट पुढे ढकलल्याचे सांगत आहेत. काही महिन्यांपूर्वी चित्रपटातील दोन प्रमुख भूमिकेच्या पात्रांचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला होता.

हा चित्रपट अनुजा चौहान या प्रसिद्ध लेखिकेच्या 'द झोया फॅक्टर' या नॉवेलवर आधारित आहे. यामध्ये झोया सिंह सोलंकी या राजपूत मुलीची प्रेमकथा आहे. कारण कोणतेही असो पण आता प्रेक्षकांना हा चित्रपट बघण्यासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे हे नक्की. मात्र या जुलै महिन्याच्या शेवटी चित्रपटाचा ट्रेलर मात्र प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे त्यामुळे हे ही नसे थोडके असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@