'लीला' चा ट्रेलर चित्तथरारक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-May-2019
Total Views |




आपल्या मुलीच्या शोधात असलेली स्त्री कोणकोणती अग्निदिव्य पार पाडते. लीला या नव्या नेटफ्लिक्स ओरिजिनलमध्ये लीलाचा शोध प्रत्येकालाच घ्यायचा आहे. मात्र हुमा खुरेशी या ट्रेलमध्ये एक असामान्य शक्तीच्या रूपात प्रेक्षकांना दिसून येईल. तिचा अभिनय अप्रतिम तर आहेच मात्र सिरीजची दिग्दर्शिका दीपा मेहता यांनी या कथेतील रहस्य अतिशय कौशल्याने राखून ठेवले आहे.

 

ट्रेलरमधील सिद्धार्थ आणि हुमा खुरेशी यांच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक होताना दिसत आहे. ही कथा आंतरधर्मीय विवाहावर आधारित असून सिरीजमधील हुमा खुरेशी म्हणजेच शालिनीचा एका मुस्लिम व्यक्तीशी विवाह झाला आहे त्यांना एक लहान मुलगी आहे जिचे नाव आहे लीला. आपले वैवाहिक जीवन आनंदाने घालवत असतानाच एक वादळ येते आणि लीलाला त्यांच्यापासून लांब घेऊन जाते. आणि मग तिच्या आयुष्यातील हे वादळ शमण्याचे नावच घेत नाही.

आता ती या सगळ्या संकटांवर मात करून आपल्या मुलीला कसे परत मिळवेल? या प्रश्नाचे उत्तर कदाचित आपल्याला या सिरीजमधील ६ एपिसोडमध्ये मिळेल. ही नेटफ्लिक्स ओरिजिनल सिरीज येत्या १४ जूनला दर्शकांच्या भेटीस येत आहे.



माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@