'लाईन्स' चित्रपटाचे पोस्टर पाहिले का?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-May-2019
Total Views |


 

सध्या कान चित्रपट महोत्सवामधील तिच्या पदार्पणामुळे चर्चेत असलेल्या हीन खानच्या बॉलिवूडमधील पदार्पणाबद्दल देखील चर्चा रंगताना दिसत आहेत. हीना खान ही एक टेलिव्हिजन अभिनेत्री म्हणून घराघरात प्रसिद्ध आहे. हीना खान या आगामी चित्रपटातून देशभरात प्रसिद्धी प्राप्त करण्याच्या प्रयत्नात असताना आज 'लाईन्स' या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रकाशित झाले.

 

या पोस्टरमध्ये तिचा पूर्ण चेहेरा वेगवेगळ्या भागांमध्ये विभागलेला आहे. मात्र यामध्ये तिच्या चेहऱ्यावर ती घाबरल्याचे भाव रेखाटण्यात आले आहेत. 'लाईन्स' हा चित्रपट कारगिल युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारलेला असल्याने त्याचे बहुतांश चित्रीकरण जम्मू मध्ये झाले आहे. फरीदा जलाल सारख्या दिग्गज अभिनेत्री या चित्रपटात हीना खानच्या आजीची भूमिका साकारणार आहेत तर ऋषी भूतानी चितंत्रपटातील नायकाची भूमिका साकारणार आहेत.

'लाईन्स' या चित्रपटाची निवड कान चित्रपट महोत्सवासाठी करण्यात आली असल्याने आणि आणखीही अनेक कारणांनी या चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे. हा चित्रपट जुलै मध्ये प्रदर्शित होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
 
@@AUTHORINFO_V1@@