काळजी घ्या! मुंबईसह राज्यातील तापमानात वाढ होणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-May-2019
Total Views |



मुंबई : मुंबईसह राज्यातील तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. राज्यातल्या बऱ्याच भागांतील कमाल तापमानात १९ मे पासून वाढ होणार असल्याचे त्यांनी सांगितले. विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील बऱ्याच भागांतील कमाल तापमानात लक्षणीय वाढ होणार असल्यामुळे २५ मे पर्यंत या भागातील कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहील. तसेच मुंबईतही उकाड्याची तीव्रता वाढणार असल्याचे यावेळी ते म्हणाले.

 

मुंबईतील कमाल तापमानात १८ ते २१ मे दरम्यान वाढ अपेक्षित आहे. अकोला, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांत कमाल तापमान ४६ अंशापर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे, तर चंद्रपूर जिल्ह्यात कमाल तापमान ४७ अंशापर्यंत पोहोचण्याची शक्यता नाकारता येणार नाही. विदर्भातील उर्वरित जिल्ह्यांसह धुळे, जळगाव, नांदेड आणि परभणी जिल्ह्यांत कमाल तापमान ४५ अंशापर्यंत पोहोचेल.

 

वाढत्या तापमानापासून विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील लोकांनी काळजी घ्यावी. लोकांनी योग्य प्रमाणात पाणी प्यावे आणि उष्माघाताचे लक्षण आढळल्यास त्यावर लागलीच उपचार करावा, असे आवाहन हवामान तज्ज्ञांनी केले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@