पुन्हा एकदा रंगणार बिग बॉसच्या घरात युद्ध

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-May-2019
Total Views |

बिग बॉस मराठी सिझन दुसरा २६ मे संध्या. ७ वा. आणि रोज रात्री ९.३० वा.
रीनचा प्रस्तुतकर्ते म्हणून सहभाग आणि विशेष प्रायोजक म्हणून पुराणिक आणि Helo App यांचादेखील सहभाग

मुंबई : एक असं घर ज्याने तमाम प्रेक्षकांची मने जिंकून त्यांना आपलसं केलं, एक असं घर ज्याने भांडण-वाद विवाद बघितले, असं घर ज्याने मैत्री कशी निभवावी हे शिकवलं, ज्याने सदस्यांचे रडण – हसण पाहिलं, ज्या घराने सदस्यांचे मुखवटे काही दिवसांतच उतरवले आणि त्यांचा खरा चेहरा प्रेक्षकांसमोर आणला, असं घर जे महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचलं...आता ते घर परत येत आहे नवे आणि अतरंगी सदस्य घेऊन तुमचं मनोरंजन करायला, तुमची मने पुन्हा जिंकायला...तुम्हांला नवा अनुभव मिळवून द्यायला...राजकारण्याची महत्वकांक्षा, लावणी नृत्यांगनेला तिची प्रतिष्ठा पुन्हा कमवण्याची संधी, सेलिब्रिटी शेफ तसेच पुन्हा एकदा चित्रपटात प्रवेश करण्याची कलाकाराला मिळालेली सुवर्णसंधी अश्या विविध, विलक्षण स्वभावांची व्यक्ती पुन्हा एकदा एकत्र येणार “त्या” घरात...कारण कलर्स मराठी पुन्हा एकदा घेऊन येत आहे प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा, मराठी टेलिव्हीजनवरचा सगळ्यात उत्कंठावर्धक रिऍलिटी शो म्हणजेच रीन प्रस्तुत बिग बॉस मराठी - सिझन दुसरा कार्यक्रमासाठी विशेष प्रायोजक म्हणून पुराणिक आणि Helo App यांचादेखील सहभाग....विविध क्षेत्रातील १५ कलाकार घेऊन बिग बॉस मराठी सिझन २ सज्ज आहे मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करायला.

बिग बॉसच्या घरातील सदस्य आणि प्रेक्षक यांच्यामधील दुवा म्हणजे कार्यक्रमाचे सूत्रसंचालक महेश मांजरेकर. मागच्या पर्वात आपल्या दमदार व्यक्तिमत्वाने ज्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली तेच महेश मांजरेकर याही पर्वात सुत्रसंचालकाची महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहेत. मागच्या पर्वात त्यांनी ज्या प्रकारे घरातील सदस्यांना कधी मित्र बनून, तर कधी गुरु बनून, तर कधी मार्गदर्शक बनून तर कधी घरातील एक मोठी व्यक्ती बनून मार्गदर्शन केलं प्रसंगी परखड मत व्यक्त करत त्यांचे कानही उपटले.. चुकलेल्यांना समज दिली, खोटेपणाचे मुखवटे उतरवण्याचं काम केलं हे सर्व काही आता याही पर्वात बघायला मिळणार आहे. एक उत्तम अभिनेता, एक कौशल्यपूर्ण दिग्दर्शक यामुळे महेश मांजरेकर प्रत्येक मराठी प्रेक्षकांना आपलेसे वाटतात आणि त्यांच्या याच स्वभावगुणांमुळे त्यांच्याबद्दल आदरयुक्त भिती सुद्धा वाटते त्यामुळे याहीवर्षी ते घरातील सदस्यांबरोबरच प्रेक्षकांवरही आपल्या दमदार सुत्रसंचालनाची छाप सोडतील हे निश्चित. एंडेमॉल शाइन इंडिया निर्मित बिग बॉस मराठी सिझन २ एका दिमाखदार सोहळ्याद्वारे २६ मे रोजी संध्या. ७.०० वा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. त्यानंतरचे भाग सोम ते रवि रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर. बिग बॉसच्या घरातील सदस्यांची धम्माल मस्ती, एकमेकांबद्दल करत असलेले गॉसिप याबद्दल तरूण पिढी मध्ये खूपच उत्सुकता असते यावेळेसदेखील VOOT वर कार्यक्रमाचे मूळ भाग, अनदेखा आणि प्रक्षेपित न केलेले भाग प्रेक्षक कधीही बघू शकतात.

बिग बॉसच्या कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी सर्वात मोठी उत्सुकता असते यात कोणते स्पर्धक सहभागी होतायत. संपूर्ण महाराष्ट्र आता या सिझनमध्ये कोणते कलाकार सदस्य म्हणून असतील याबाबत प्रेक्षक तर्क लावू लागले आहेत. बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सिझनचे सूत्रसंचालन देखील महेश मांजरेकर करणार असून बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनमध्ये विविध क्षेत्रातील १५ लोकप्रिय व्यक्तिमत्व घरामध्ये सदस्य म्हणून जाणार आहेत. याव्यतिरिक्त प्रेक्षकांसाठी एक मोठं सरप्राईझ असणार आहे आणि ते म्हणजे बिग बॉसचे घर जे तब्बल १४,००० चौरस फूट अश्या भव्य जागेमध्ये तयार करण्यात आले आहे. या घराला आलिशान अस्सलं मराठमोळ्या वाड्याचे स्वरूप देण्यात आले आहे, ज्याच्या मध्यभागी मोठे आंगण आणि मोठे ऍक्टिव्हिटी क्षेत्र असणार आहे. याव्यतिरिक्त, एक भव्य सेट तयार करण्यात आला आहे ज्याद्वारे महेश मांजरेकर स्पर्धकांशी संवाद साधतील. बिग बॉसची नजर तुमच्यावर देखील आहे तेव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन दुसरा कलर्स मराठीवर आणि चुकून राहीलच तर व्हिसिट करा www.colorsmarathi.com ...

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
 
@@AUTHORINFO_V1@@