पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी मराठा आरक्षण अध्यादेश जारी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-May-2019
Total Views |



मुंबई : मराठा आरक्षणातील एका अटीमुळे पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशापासून वंचित राहिलेल्या मराठा विद्यार्थ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. या विद्यार्थ्यांसाठी सरकारने अध्यादेश जारी केला आहे. मराठा आरक्षणासाठी अध्यादेश जारी करण्यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी मिळाल्यानंतर शुक्रवारी राज्य मंत्रिमंडळाची विशेष बैठक झाली. त्यात पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशावर चर्चा झाली आणि मराठा विद्यार्थ्यांसाठी अध्यादेश जारी करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली.

 

"मेडिकलच्या मराठा विद्यार्थांना महाविद्यालयात प्रवेश मिळण्यासाठी १६ टक्के आरक्षणासाठी सरकार अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मेडिकलमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थांना दिलासा मिळणार आहे. राज्यपालांची सही झाल्यानंतर अध्यादेश लागू होणार आहे. खुल्या वर्गाला खासगी विद्यालयात शिष्यवृत्ती दिली जाणार आहे." अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

 

राज्य सरकारने निवडणुकीतील आचार संहिता असल्याने निवडणूक आयोगाकडे अध्यादेश जारी करण्यासाठी परवानगी मागितली होती. काही दिवसांपूर्वा उच्चं न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मेडिकल कॉलेजमध्ये पदव्युत्तर पदवीच्या अभ्यासक्रमासाठी मराठा कोट्यातून आरक्षणावर रोख लावली होती. राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा कायदा ३० नोव्हेंबर २०१८ ला लागू केला होता. तर नीटची परीक्षा प्रक्रिया ३ नोव्हेंबरपासून सुरु झाली होती.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@