ऑस्ट्रेलियात मतदान बंधनकारक : अन्यथा आकारला जातो दंड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-May-2019
Total Views |



मेलबर्न : ऑस्ट्रेलियामध्ये शनिवारी मतदान पार पडणार आहे. भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये मतदान करणे जनतेच्या सहभागावर अवलंबून असते मात्र, ऑस्ट्रेलियासह २३ देशांमध्ये मतदान हे अनिवार्य करण्यात आले आहे. म्हणजेच या देशांतील नागरिकांनी मतदान न केल्यास त्यांना दंड आकारला जाऊ शकतो. ऑस्ट्रेलियामध्ये १९२४ मध्ये अशाप्रकारे मतदान करणे बंधनकारक करण्यात आले. त्यानंतर मतदानाची टक्केवारी ९१ टक्क्यांपेक्षा खालावलेली नाही. या कायद्यानंतर देशातील नागरिकांनी लोकशाहीस, मतदान आणि राजकारणात सक्रीय सहभाग घेऊ लागले.

 

मतदान न केल्यास न्यायालयाच्या फेऱ्या

ऑस्ट्रेलियामध्ये मतदान नाव नोंदणी आणि मतदान करणे दोन्हीही कायदेशीर बंधनकारक करण्यात आले आहेत. त्यात १८ वर्षावरील प्रत्येक व्यक्तीला मतदान बंधनकारक आहे. मतदान न केल्यास सरकार त्याचा जाब विचारू शकते आणि समाधानकारक उत्तर न मिळाल्यास २० ऑस्ट्रेलियन पौंड इतका दंड भरावा लागतो. त्याशिवाय कायदेशीर प्रक्रीया पार पडलेली नाही.

 

मतदान न करणारे हे लोकशाहीचे विरोधक

मतदान प्रक्रीया न करणाऱ्यांना लोकशाहीचे विरोधक मानले जाते. या देशातील नागरिक मानतात कि, प्रत्येक नागरिकाने लोकशाहीत सहभागी व्हायलाच हवे. सरकार निवडण्यात प्रत्येकाची भूमिका महत्वाची असायला हवी. देशात नागरिकही या मतदान प्रक्रीयेला महत्व देतात. अमेरिकेतील मतदान आकडेवारी ५५ टक्के आणि युकेमध्ये ७० टक्के इतके असते. ऑस्ट्रेलियात मतदानाची टक्केवारी ९१ टक्क्यांपेक्षा खाली आलेली नाही.

 

मतदारांना मिळतात या सोयी

ऑस्ट्रेलियात मतदान करण्यासाठी येणाऱ्या दिव्यांगांना विशेष सवलती दिल्या जातात. काही रुग्णांना मतदानाला येणे शक्य नसल्यात त्यांच्यासाठी मतदानाची सोय केली जाते. ज्यांना मतदान केंद्रावर येणे शक्य नाही त्यांना प्री-वोटींग सिस्टमद्वारे मतदान करण्याची सोय उपलब्ध आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@