'दबंग ३' मध्ये मौनी रॉय आणि सलमान एकत्र डान्स करणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-May-2019
Total Views |


दबंग आणि दबंग २ नंतर आता २० डिसेंम्बर २०१९ ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यामध्ये सलमान खान मुख्य भूमिका साकारणार असून सोनाक्षी सिन्हा या चित्रपटात सलमान खानबरोबर स्क्रीन शेअर करताना
पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला मागच्या महिन्यापासूनच सुरुवात झाली आहे. 


दबंग आणि दबंग २ मधील मलायका अरोरा आणि करीना कपूर यांच्या गाण्यांना प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला होता. आता दबंग ३ मध्ये मौनी रॉय एका नव्या गाण्यातून आपल्या नृत्याची झलक प्रेक्षकांना दाखवणार असल्याचे नुकतेच जाहीर करण्यात आले. या गाण्याच्या चित्रीकरणाला पुढच्या आठवड्यापासून सुरुवात होईल त्या आधी गाण्यासाठीची पूर्वतयारी आधीच पूर्ण करण्यात आली आहे


दबंग ३ मध्ये सलमान खान आणि सोनाक्षी सिंह यांच्याबरोबरच निखिल द्विवेदी आणि विशेष म्हणजे दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध कलाकार किच्चा सुदीप हे खलनायकाची भूमिका साकारणार आहेत.
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
 
 
@@AUTHORINFO_V1@@