'बिग बॅंग थिअरी' ने अखेर हसता हसता प्रेक्षकांना रडवले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-May-2019
Total Views |

 

प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या बिग बॅंग थिअरी या मालिकेचा काल अखेरचा भाग प्रसारित झाला. गेली १२ वर्ष दर्शकांना हसवता हसवता कालच्या अखेरच्या भागानंतर मालिकेतील कलाकार तर भावनावश झालेच मात्र चाहत्यांना देखील अश्रू अनावर झाले. बिग बॅंग थिअरी ही मालिका २००७ साली सुरु झाली. या मालिकेला आत्तापर्यंत १० एमी अवॊर्डस प्राप्त झाले आहेत तर जगातील वेगवेगळ्या भागातील जवळ जवळ २० मिलियन लोक ही मालिका बघतात.




बिग बॅंग थिअरी ही विनोदी शैलीची मालिका असून विज्ञान, गणित आणि इतिहास या विषयांना एका वेगळ्याच पद्धतीने प्रेक्षांसमोर आणण्यात या मालिकेतील कलाकारांना यश मिळाले. या मालिकेतील शेल्डन कूपर, पेनी, राज, लेनर्ड, एमी, हार्वर्ड आणि बर्नेट या पात्रांनी प्रेक्षकांच्या मनावर एक छाप पाडली. ही मालिका आणि विशेषतः शेल्डन कूपरची भूमिका इतकी लोकप्रिय झाली की या मालिकेचे दिग्दर्शक चक लोरे यांनी या मालिकेचे प्रीक्वल म्हणजेच यंग शेल्डन ही मालिका देखील सुरु केली. 




विज्ञानासारखा क्लिष्ट विषय देखील इतक्या सोप्या पद्धतीने आणि लोकांना हवाहवासा वाटेल अशा पद्धतीने मांडणे म्हणजे खरेच खूप कठीण काम. पण या मालिकेच्या पूर्ण टीमने हे काम अतिशय उत्तम पद्धतीने केले याचीच साक्ष म्हणजे या मालिकेला मिळालेले लोकांचे प्रेम आहे.


 


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
 
@@AUTHORINFO_V1@@