हिना खानच्या चाहत्यांचा जितेश पिल्लई यांच्यावर हल्लाबोल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-May-2019
Total Views |

 

भारतातील मनोरंजन क्षेत्रातील एक आघाडीची कलाकार हिना खान हिने आज कान सारख्या एका प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात आपला सहभाग नोंदवला. कान चित्रपट महोत्सवाच्या रेड कार्पेटवरील पदार्पणाचे तिच्या चाहत्यांनी भरभरून कौतुक केले मात्र बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध मासिकाचे संपादक जितेश पिल्लई यांना तिचा लूक फारसा पसंत पडला नाही असे दिसते.

 

जितेश पिल्लई यांनी आपल्या सोशल मीडियावरून हिना खानच्या रेड कार्पेट लुकवर टीकात्मक मजकूर लिहिला. अचानक 'चांदिवली स्टुडिओ' मध्ये आल्यासारखे वाटते आहे असे म्हणत त्यांनी हिना खानच्या लुकचा फोटो शेअर केला आणि तिच्या चाहत्यांनी जितेश पिल्लई यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 


७२ व्या कान चित्रपट महोत्सवात होणाऱ्या इंडिया पव्हेलियनमध्ये हिना स्पिकर म्हणून हजेरी लावणार असून येत्या २५ मेला हा कार्यक्रम पार पडणार आहे. हिना खानच्या
'लाइन्स' या शॉर्टफिल्मची कानमध्ये निवड करण्यात आली आहे. कारगिल युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित असलेल्या या शॉर्टफिल्मची 'कानसाठी निवड झाली आहे. फ्रान्समधील फ्रेंच रिवेरा येथे १४ मे पासून २५ मे पर्यंत कान चित्रपट महोत्सव पार पाडणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@