सचिन-विनोद पुन्हा एकत्र ; आयसीसीकडून ट्रोल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-May-2019
Total Views |


 


मुंबई : सचिन तेंडुलकर मैदानात खेळताना अनेकदा प्रतिस्पर्धी टीमला आपल्या बॅटने प्रत्त्युतर दिल्याचे आपण पाहिले आहे. सचिनने नेहमीच मैदानात वाकयुद्धापेक्षा बॅटने सडेतोड उत्तर दिले आहे. सचिनने कधीच पंचांनी दिलेल्या निर्णयाला आव्हान दिले नाही. वेस्टइंडिजचे माजी अंपायर स्टीव बकनर यांच्यावर तेंडुलकरला अनेकदा चुकीच्या पद्धतीने आऊट दिल्याचे बोलले जाते. त्यावरुन सचिनने शेअर केलेल्या एका व्हिडिओवर आयसीसीने सचिनला ट्विटद्वारे ट्रोल केले होते. याला सचिनने आपल्या नेहमीच्याच शैलीत उत्तर दिले आहे.

 
 
 

सचिनने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर तो नवख्या खेळाडूंना क्रिकेटचे धडे देत आहे. असाच एक बॉलिंग करतानाचा व्हिडिओ शूट करुन सचिनने आपल्या ट्विटर अकाउंटवरुन शेअर केला. या व्हिडिओमध्ये सचिन आपल्या सहकारी विनोद कांबळीला बॉलिंग करताना दिसतोय. तसेच सचिनची बॅटिंग यात पाहता येतेय. हा संपूर्ण व्हिडिओ सचिनने शेअर केला.

 
 
 

क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर सचिन अनेक नवख्या खेळाडूंना 'तेंडुलकर-मिडलएक्स ग्लोबल अकादमी'द्वारे क्रिकेटचे प्रशिक्षण देतो. यामध्ये विनोद कांबळी देखील सचिन सोबत असतो. सचिनने व्हिडिओ शेअर करताना लिहिले आहे की, 'विनोद कांबळी सोबत पुन्हा एकदा खेळून आनंददायी वाटले. या व्हिडियोमुळे आमच्या लहाणपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. फार कमी लोकांना माहिती आहे की, मी आणि विनोद नेहमी एकाच टीमकडून खेळलो आहोत. आम्ही कधीच एकमेकांविरुद्ध खेळलो नाहीत.'

 
 
 

सचिनने शेअर केलेल्या व्हिडियोला आयसीसीने एका फोटोद्वारे ट्रोल केले आहे. यामध्ये आयसीसीने वेस्टइंडिजचे माजी अंपायर स्टिव बकनर यांचा फोटो टाकला आहे. या फोटोत स्टीव बकनर नो बॉल देत असल्याचा फोटो शेअर केला आहे. आपल्या पायावर लक्ष देण्याचा सल्ला आयसीसीने या फोटोद्वारा दिला आहे. सचिनने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये बॉलिंग दरम्यान त्याचा पाय, अनेकदा लाईनीच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. त्यामुळे स्टीव बकनर यांचा नो बॉलच्या इशाराच्या फोटो शेअर केला आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@