अमेरिकेत राष्ट्रीय आणीबाणी! डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-May-2019
Total Views |



वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशात राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली आहे. परकीय शत्रूंपासून अमेरिकेच्या कॉम्प्युटर नेटवर्क्सना वाचविण्यासाठी ट्रम्प यांनी हे पाऊल उचलले आहे. मात्र, आणीबाणीच्या निर्णयामुळे आता अमेरिकन कंपन्यांना राष्ट्रीय सुरक्षेत अडचणी आणणार्या परदेशी टेलिकॉम कंपन्यांची सेवा वापरता येणार नाही. ट्रम्प यांनी याबद्दलच्या आदेशावर स्वाक्षरी केल्याची माहिती व्हाईट हाऊसच्या माध्यम सचिव सारा सँडर्स यांनी दिली.

 

व्हाईट हाऊसने जारी केलेल्या आदेशात कोणत्याही कंपनीच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. मात्र, अमेरिकेत आणीबाणी लागू होताच हुवेईने प्रतिक्रिया दिली आहे. हुवेईच्या मते, आणीबाणीमुळे केवळ अमेरिकन कंपन्यांचे आणि नागरिकांचेच नुकसान होईल. हुवेईच्या उत्पादनांचा वापर चीनकडून नजर ठेवण्यासाठी केला जात असल्याची चिंता अमेरिकेच्या कंपन्यांनी अनेकदा व्यक्त केली होती. हुवेईचे अमेरिकेतले अस्तित्व कमी करण्यासाठी अमेरिकेच्या व्यापार मंत्रालयाने आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. व्यापार मंत्रालयाने हुवेईचा समावेश ’एन्टीटी यादी’त केला. यामुळे अमेरिकन कंपन्यांमधले तंत्रज्ञान ताब्यात घेताना हुवेईला अमेरिकन सरकारची परवानगी घ्यावी लागेल. यामुळे अमेरिका आणि चीनचे संबंध आणखी ताणले जाण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. अमेरिका आणि चीनमध्ये आधीच व्यापारयुद्ध सुरू आहे. त्यात आता यामुळे भर पडणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@