भारताने असाही फडकवला क्रिकेटमध्ये तिरंगा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-May-2019
Total Views |



नवी दिल्ली : क्रिकेट विश्वामध्ये भारताचा तिरंगा पुन्हा एकदा दिमाखात फडकला आहे. आयसीसीच्या मॅच रेफ्री आंतरराष्ट्रीय पॅनलवर पुरुषांची मक्तेदारी असताना आयसीसीच्या या पॅनलमध्ये भारताच्या जी.एस. लक्ष्मी यांचा समावेश करण्यात आला आहे. जी.एस. लक्ष्मी या आयसीसीच्या मॅच रेफ्री आंतरराष्ट्रीय पॅनलमध्ये सहभागी झालेल्या पहिल्या महिला आहेत.

 

५१ वर्षांच्या जीएस लक्ष्मी आत्तापर्यंत स्थानिक महिला क्रिकेटमध्ये २००८पासून मॅच रेफ्रीची भूमिका निभावत आहेत. महिलांच्या ३ वनडे आणि ३ टी-२० आंतरराष्ट्रीय मॅचमध्येही जीएस लक्ष्मी रेफ्री राहिल्या आहेत. "आयसीसीच्या आंतरराष्ट्रीय पॅनलवर नियुक्त होणे हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. यामुळे माझ्यासाठी नवीन दरवाजे उघडले आहेत. भारतामध्ये एक क्रिकेटपटू आणि मॅच रेफ्री म्हणून माझी कारकिर्द बराच काळ चालली. आता एक खेळाडू आणि मॅच अधिकारी म्हणून मिळालेल्या अनुभवाचा मी आंतरराष्ट्रीय पातळीवर उपयोग करीन." अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@