मराठा विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशाचा मार्ग मोकळा : सरकार वटहुकूम काढणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-May-2019
Total Views |




मुंबई : वैद्यकीयच्या पदव्युत्तर प्रवेशाला आठवडाभराची मुदतवाढ देण्यासंदर्भातील महत्वाचा निर्णय राज्य सरकारतर्फे बुधवारी रात्री घेण्यात आला होता. यानिर्णयाला प्रवेश नियंत्रण समितीने मंजुरी दिल्यानंतर आता राज्य मंत्रिमंडळाची शुक्रवारी दुपारी एक महत्वाची बैठक होणार आहे. बैठकीत मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमात पूर्वलक्षी प्रभावाने आरक्षण देण्यासंदर्भातील वटहुकूमाच्या मसुद्याला मंजुरी देण्यात येणार आहे.

 

वैद्यकीय प्रवेशासाठी शुक्रवारी अध्यादेश काढण्यात येणार असून, त्याला मंजुरीही मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे वैद्यकीय आणि दंतवैद्यक पदव्युत्तर अभ्यासक्रमातील मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या राखीव जागांवर रद्द झालेल्या प्रवेशाचा प्रश्न सोडवण्यासाठी वटहुकूम काढण्याच्या हालचालीही गेल्या काही दिवसांपासून सरकारने सुरू केल्या होत्या. लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू असल्याने त्यात अडचण येत होती. हा वटहुकूम काढण्यात निवडणूक आयोगाची परवानगी मिळणार घ्यावी लागणार आहे. त्यासंदर्भात सकारात्मक निर्णय लवकरच येईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

वैद्यकीय आणि दंतवैद्यक पदव्युत्तर अभ्यासक्रमातील मराठा समाजातील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तत्पूर्वी प्रवेश रद्द झाल्याने मराठा समाजातील विद्यार्थी आक्रमक झाले असून, आझाद मैदनावर त्यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. राज्य सरकारने त्वरित वटहुकूम काढून वैद्यकीय प्रवेशाचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती.



सर्वोच्च न्यायालाच्या निर्णयामुळे अडीचशे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळेच या विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात आहे. अजित पवार यांनी काही विद्यार्थ्यांसमवेत मंत्री महाजन यांची भेट घेऊन हा प्रश्न सोडवण्याची विनंती केली होती.
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@