ऐश्वर्या राय साकारणार खलनायिकेची भूमिका ??

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-May-2019
Total Views |


 

दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या आगामी चित्रपटात बॉलिवूमधील लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या राय एका नव्या अवतारात प्रेक्षकांसमोर येणार आहे. १० व्या शतकातील चोळ साम्राज्याच्या कथेवर हा चित्रपट बेतलेला आहे. ऐश्वर्या राय फने खान नंतर बऱ्याच काळाने पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. या आगामी चित्रपट एक वेगळे आव्हान पेलायचे ऐश्वर्याने ठरवले असून ती या चित्रपटात खलनायिकेची भूमिका साकारणार आहे. या आधी खाकी या चित्रपटात तिने खलनायिकेची भूमिका साकारली होती.


हा आगामी चित्रपट पोन्नीयीन सेल्वम या तामिळ भाषेतील कल्की यांनी लिहिलेल्या नॉवेलवर आधारलेला आहे. ऐश्वर्या राय या चित्रपटात चोळ साम्राज्यातील संपत्तीचे कुलपती असलेल्या पेरिया सम्राटाच्या पत्नीची म्हणजेच नंदिनीची भूमिका साकारणार आहे. नंदिनी चोळ साम्राज्याचे पतन करण्यासाठी सम्राट पेरिया याला फूस लावून चोळ साम्राज्याचा खजिना हडपण्याच्या प्रयत्नात आहे. या कथेवर आधारित हा चित्रपट आहे.


ऐश्वर्या राय बरोबर विक्रम, सिम्बू आणि जयम रवी हे देखील महत्वाच्या भूमिका साकारणार असून या चित्रपटाच्या प्री-प्रोडक्शन च्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे हा चित्रपट २०१९ च्या अखेरीस प्रेक्षकांच्या भेटीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@