'भारत' मधील हे चित्रीकरण सर्वात अवघड- अली अब्बास जफर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-May-2019
Total Views |



सलमान खान आणि कतरीना कैफ यांचा 'भारत' चित्रपट प्रदर्शनाच्या शेवटच्या टप्प्यात असताना दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दृष्टीने सर्वात अवघड गेलेल्या सिनचे फोटो आपल्या सोशल मीडियावरून शेअर केले. फाळणीदरम्यान देशाची झालेली दयनीय अवस्था या चित्रीकरणात आपल्याला पाहायला मिळेल. याच सिंचे चित्रीकरण सर्वात आव्हानात्मक ठरल्याचे अली अब्बास जफर यांनी म्हटले आहे.



फाळणी दरम्यान झालेले देशातील नागरिकांचे हाल, त्यांना झेलावे लागलेले कष्ट, कुटुंबीयांची फरफट आणि कुचंबणा या सगळ्याचे चित्रीकरण या आधी देखील अनेक चित्रपटांमध्ये आपण पहिले असेल. मात्र तो काळ पुन्हा एकदा जिवंत व्हावा आणि प्रेक्षकांना त्या भावना खऱ्या अर्थाने जाणवायला हव्या यासाठी दिग्दर्शक कसोशीने प्रयत्न करतो. आणि म्हणूनच हा सिन मोठ्या पडद्यावर उभा करणे हे आव्हानात्मक आहे. भारताच्या इतिहासातील एक महत्वाचा काळ या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण पंजाब, दिल्ली आणि आबू-धाबी मध्ये करण्यात आले आहे.

सलमान खान, कतरीना कैफ यांच्यासह जॅकी श्रॉफ, तब्बू, सुनील ग्रोव्हर आणि दिशा पटनी हे कलाकार देखील चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहेत. येत्या ५ जूनला हा चित्रपट सर्व देशभर प्रदर्शित होणार आहे.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@