ममतांची माफी मागणार नाही प्रियांका शर्मा यांची ठाम भूमिका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-May-2019
Total Views |


नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमुल कॉंग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्यावर मीम बनवणाऱ्या प्रियांका शर्मा यांची अखेर मंगळवारी सुटका करण्यात आली आहे. मात्र, 'मी माफी न मागण्याच्या भूमिकेवर ठाम आहे', असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. प्रियांका शर्मा या भाजपच्या कार्यकर्त्या आहेत. मला ममतांची मुळीच भीती नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

 

यासह प्रियांका यांनी तुरुंगातही ममता बॅनर्जी यांच्या हुकूमशाहीचा अनुभव दिसून आला असा आरोप त्यांनी केला आहे. त्या म्हणाल्या, "मला माझ्या वकीलांशी आणि पक्षाशी बोलू दिले नाही. मी माफी मागणार नाही. मी खटला लढणार आहे. मला जामिन मिळूनही १८ तास कैदेत ठेवण्यात आले होते. मला माझ्या परिवाराशीही भेटू दिले जात नव्हते. माझ्याकडून जबरदस्तीने माफीनामा लिहून घ्यायला लावला ", असा आरोपही प्रियांका यांनी केला आहे.

 

प्रकरण नेमके काय ?

मेट गाला २०१९ मध्ये प्रियांका चोप्राने केलेल्या वेषभूषेमध्ये छेडछाड करून प्रियांका चोप्राच्या ऐवजी ममता बॅनर्जींचा चेहरा लावून हा फोटो प्रियांका शर्मा यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून शेअर केला असा आरोप प्रियांका शर्मा यांच्यावर करण्यात आला होता. तसेच मुख्यमंत्र्यांच्या फोटोमध्ये छेडछाड करणे हा अपराध असून ममता बॅनर्जींचा अपमान आहे. हा फक्त ममतांचा अपमान नाही तर बंगालच्या संस्कृतीचा अपमान असल्याचे ममता बॅनर्जी यांचे वकील हाजरा यांनी दाखल केलेल्या तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले होते.

 

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@