अलाद्दिन चित्रपटाचे बॉलिवूड कनेक्शन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-May-2019
Total Views |


 

लहानपणी आपण पाहिलेले 'अलाद्दिन' चे कार्टून आठवते का ? तसेच अलाद्दिनचा चिराग आणि त्यातून बाहेर येणारा जीनी ? आता पुन्हा एकदा हा अल्लादिन आपल्या भेटीस एका नव्या रूपात येत आहे. डिस्नीची निर्मिती असलेल्या या नव्या अलाद्दिनमध्ये हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता विल स्मिथ जीनी ची भूमिका साकारणार आहे.

अलाद्दिनचे बॉलिवूड कनेक्शन

आता तुम्ही म्हणाल डिस्नीची निर्मिती असलेल्या हॉलिवूडच्या चित्रपटात भारताचे कनेक्शन काय असेल ? तर हा चित्रपट हिंदीमध्ये देखील प्रदर्शित होणार आहे. आणि यामध्ये बॉलिवूडमधील आघाडीचा संगीत दिग्दर्शक, गायक आणि रॅपर बादशाह याने या चित्रपटासाठी 'सब सही है ब्रो' नावाचे गाणे संगीतबद्ध केले आहे. बादशाह बरोबरच अरमान मलिक याने अलाद्दिनच्या पात्राला आवाज दिला आहे.

 

अलाद्दिन आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देईल यात शंकाच नाही. हा चित्रपट येत्या २४ मे ला प्रदर्शित होणार आहे.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@