कमल हसनचे वादग्रस्त विधान - हा बहुसंख्य हिंदूंचा अपमान : शरद पोंक्षे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-May-2019
Total Views |




मुंबई : महात्मा गांधींची हत्या करणारा नथुराम गोडसे हा स्वतंत्र हिंदुस्थानातील पहिला हिंदू दहशतवादी होता, असे वादग्रस्त वक्तव्य कमल हसनने काल तामिळनाडूत केले होते. या वक्तव्यावरून सध्या रान उठले असून वादाची ठिणगी पडली आहे. मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनी कमल हसन यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे. पोंक्षे म्हणाले, “दहशतवादाला धर्म नसतो. पण पकडलेला दहशतवादी हा मुस्लीम असतो, हे जगातले वास्तव आहे. हिंदू धर्म हा मुळातच सहिष्णुवादी. इतिहास साक्ष आहे की हिंदूंनी कधीही दहशतवादी कारवाया केल्या नाहीत. आक्रमणे केली नाहीत. आम्ही प्रत्येक मुसलमानाकडे दहशतवादी म्हणून बघतच नाही. म्हणूनच जगात मुसलमान सर्वात सुरक्षित व सुखी हिंदुस्थानात आहेत. पण तरीही एक अभिनेता केवळ राजकीय स्वार्थासाठी हिंदू दहशतवादी असा उल्लेख करतो तेही जाहीरपणे आणि आपण ते खपवून घेतो. हाच हिंदूंचा सहिष्णुपणा आहे. हा कोणा पक्षाचा अपमान नाही. हा बहुसंख्य हिंदूंचा अपमान आहे. त्यामुळे मी या प्रवृत्तीचा निषेध करतो,” असे पोंक्षे यांनी सांगितले. तथाकथित पुरोगामी म्हणवणार्‍यांनीही हसन यांच्या वक्तव्याचा निषेध करायला हरकत नाही, असाही टोला त्यांनी मारला.

कमल हसनला म्हातारचळ लागलाय!

 

कमल हसनला म्हातारचळ लागला असून त्याच्या बोलण्याला एवढे महत्त्व द्यायची गरज नाही,” अशी सडकून टीका अभिनेत्री पायल रोहतगीने केली आहे. अभिनेता विवेक ओबेरॉयनंतर आता अभिनेत्री पायल रोहतगी हिने या वादामध्ये उडी घेत कमल हसनवर जोरदार निशाणा साधला आहे. “नथुराम गोडसे नाही, तर मोहम्मद अली जिना पहिला दहशतवादी होता,” असे विधानही तिने केले आहे. एक व्हिडिओ प्रसिद्ध करून तिने आपले मत व्यक्त केले आहे. पायल रोहतगीसह अभिनेता विवेक ओबेरॉय यानेही कमल हसनचे वक्तव्य देशात असंतोष व विभाजन करणारे आहे, असे म्हटले आहे. ट्विट करत विवेकने आपल्या भावना व्यक्त केल्या. विवेकनंतर पायल रोहतगीने कमल हसनवर टीका करत त्याला दहशतवाद आणि हत्या यातील फरक कळत नाही, असे म्हटले आहे. “राजकीय कारकिर्द बनवण्यासाठी हिंदू दहशतवादाचा राग आळवला जात आहे. हिंदू दहशतवाद या शब्दाचा वापर करून टीआरपी वाढवला जातो,” असेही तिने म्हटले आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@