गुगल ट्रेंड : कोण आहे 'ती' पिवळ्या साडीतील महिला ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-May-2019
Total Views |


 


नवी दिल्ली : लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर एक पिवळ्या साडीतील मतदान अधिकारी महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या महिलेचे नाव रीना द्विदेवी असून त्या लखनऊ येथील पीडब्ल्युडी विभागात कार्यरत आहेत. लखनऊपासून ४० किमी अंतरावर असलेल्या नगराम मतदान केंद्र १७३ येथे त्यांची नियुक्ती झाली होती.

 

काही प्रसिद्धी माध्यमांनी ही महिला नलिनी सिंह असल्याचा दावा केला होता. मिस जयपूर किताब त्यांच्या नावे असल्याचेही म्हटले होते. त्यांनंतर गेले काही दिवस रिना द्विदेवी आणि नलिनी सिंह ही दोन नावे गुगलवर सर्च करण्यात आली आहेत. गुगल ट्रेंडवर पिवळ्या साडीतील ही महिला कोण आहे ?, असे बऱ्याचजणांनी सर्च केले आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या ठिकाणी सर्वात जास्त जणांनी याबाबत सर्च केले आहे.



 

६ मे रोजी मतदान पार पडल्यानंतर हा फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. या महिलेचे नाव नलिनी सिंह सांगितले जात होते. त्यानंतऱ नलिनी सिंह हे नाव मोठ्या प्रमाणावर सर्च करण्यात आले. गुगल ट्रेंडनुसार, रिना या नावाला सरासरी २४ गुण मिळाले आहेत. तर नलिनी या नावाला १३ गुण मिळाले आहेत.

 

रिना यांची मतदानासाठी नियुक्ती लखनऊ येथे होती. मात्र, त्यांना सर्वात जास्त हिमाचल प्रदेश या राज्यातून सर्च करण्यात आले आहे. गुगल ट्रेंडनुसार, हिमाचल प्रदेश येथून शंभर टक्के सर्च करण्यात येत आहे. त्यानंतर चंदीगढ, जम्मू काश्मिर, कर्नाटक, छत्तीसगड आणि झारखंड या भागातून सर्च करण्यात आले आहे.



 

नलिनी सिंह यांचे नाव परदेशातूनही मोठ्या प्रमाणावर सर्च करण्यात आले आहे. गुगल ट्रेंडमध्ये जागतिक डाटानुसार, या महिलेला नलिनी सिंह या नावाने त्रिनिदाद एंड टोबैगो, हंगरी न्यूजीलॅड, जर्मनी, ऑस्ट्रिया, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रीका, स्विट्जरलॅड, सिंगापुर, चिली, स्पेन, फिलीपींस, मलेशिया, पोलैंड आदी देशातूनही सर्च करण्यात आले आहे. अनेक नेटीझन्सनी त्यांचे फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामवर अकाऊंट आहे का याबद्दलही शोध घेतला आहे. काहींनी त्या टिकटॉकवरही त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे.







 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@