स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे शौर्य, विज्ञान पुरस्कार जाहीर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-May-2019
Total Views |



विजयकुमार शौर्य तर डॉ. गिरीश देवधरे विज्ञान पुरस्काराचे मानकरी


मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबईच्या वतीने देण्यात येणारे यंदाचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. यंदाचा शौर्य पुरस्कार मरणोपरांत किर्तीचक्र विजेते एस. डब्ल्यू. आर. विजय कुमार यांना तर ऐरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीचे संचालक डॉ. गिरीश देवधरे यांना विज्ञान पुरस्कार जाहीर झाला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतनिमित्ताने हे पुरस्कार देण्यात येतात.

 

हे पुरस्कार मंगळवार दि. २८ मे २०१९ रोजी सायंकाळी सात वाजता स्मारकाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात प्रदान करण्यात येणार आहेत. भारतीय गुप्तहेर संघटनाचे निवृत्त अधिकारी आर. एस. एन. सिंग यांच्या उपास्थिमध्ये हा पुरस्कार सोहळा संपन्न होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. यासोबतच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीदिनी स्मारकाच्या वतीने स्मृतीचिन्ह पुरस्काराचे प्रदान करण्यात येतात. यंदा या पुरस्कारांचे मानकरी बडोदा येथील निवृत्त लेफ्ट. कर्नल विनोद फळणीकर आणि पुणे येथील दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांना प्रदान करण्यात येणार आहे.

 

या कार्यक्रमाचे औचित्य साधून आर. एस. एन. सिंग हे स्वातंत्र्यवीर सावरकर आणि राष्ट्रवाद या विषयावर आपले विचार मांडणार आहेत. स्मारकाचे अध्यक्ष अरूण जोशी, कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कार्यवाह राजेंद्र वराडकर, कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, सह कार्यवाह डॉ. सुमेधा मराठे यांचीदेखील यानिमित्ताने उपस्थिती राहणार आहे. यावेळी सावरकर व देशप्रेमींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन स्मारकाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@