'कबीर सिंह' चा ट्रेलर प्रदर्शित

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-May-2019
Total Views |

 

 
तेलगू मधील ब्लॉकबस्टर चित्रपट कबीर सिंह या चित्रपटाच्या हिंदी रिमेकचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. शाहिद कपूर आणि किआरा अडवाणी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहेत. संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित 'कबीर सिंह' च्या ट्रेलरमध्ये शाहिद कपूर अतिशय हट्टी, जिद्दी आणि विध्वंसक दाखवण्यात आला आहे. त्याचे असीम प्रेम आणि उत्कटता त्याला असे वागायला भाग पडते अशा प्रकारची कथा आपण ट्रेलरमध्ये पाहू शकतो. या चित्रपटात तो एका डॉक्टरांची भूमिका साकारणार आहे.




संथाना कृष्णन रविचंद्रन यांनी चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी केली असून सिद्धार्थ आणि गरिमा यांनी या चित्रपटाचे संवाद लिहिले आहेत. तर हर्षवर्षन रामेश्वर यांनी चित्रपटाला बॅकग्राऊंड स्कोअर दिला आहे. हा चित्रपट २१ जून ला देशभरात प्रदर्शित होणार आहे. या आधी शाहिद कपूरचा डॅशिंग लूक असलेले पोस्टर प्रकाशित करण्यात आले होते. डॉ. कबीर राजवीर सिंह असे शाहिद कपूरच्या चित्रपटातील भूमिकेचे नाव आहे. आता या ट्रेलर वरून चित्रपट पाहण्याची उत्सुकता वाढणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@