होमियोपॅथीक तपासणी केस टेकिंग भाग १८

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-May-2019
Total Views |


होमियोपॅथीक केसटेकिंग’ हा संपूर्ण होमियोपॅथीक चिकित्सेचा मुख्य पाया किंवा आधारस्तंभ आहे. या केसटेकिंगचे अनन्यसाधारण महत्त्व ज्या चिकित्सकाला कळले, त्याने रुग्णाच्या रोगनिवारणाची अर्धी लढाई जिंकली असे म्हटले जाते. निरीक्षणाच्या मुख्य मुद्द्यानंतर तो स्वत: रुग्ण प्रत्यक्षात काय बोलतो व कसे बोलतो हे पाहणे महत्त्वाचे असते. चिकित्सक अशावेळी फार संवेदनशील असावा लागतो. कारण, रुग्णाचे म्हणणे त्याच संवेदनेने व तीव्रतेने ऐकणे गरजेचे असते. जेव्हा शरीराला किंवा मनाला आजार होतो, तेव्हा संपूर्ण माणूसच विचलित होत असतो. प्रत्येक माणसाचा त्याच्या रोगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगवेगळा असतो. रुग्ण झालेला आजार कसा सामावून घेतो व त्यानुसार तो कशी प्रतिक्रिया देतो, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.

कारण
, शरीराचे हे ‘अनुकूलन’ (Adaptation) हे थेट चैतन्यशक्तीकडून आलेले असते. उदाहरणार्थ-एखाद्या रुग्णाचे जर पोट दुखत असेल, तर त्याची दुखण्यावरील प्रतिक्रिया ही तोच त्रास असलेल्या इतर रुग्णांपेक्षा वेगळी असू शकते. कोणाला वाटेल की, कर्करोगामुळे या पोटात वेदना होत तर नाही ना! कोणाला पोटाच्या वेदनांमुळे कामात अडथळा येत आहे, असे वाटत राहील. कोण नशिबाला दोष देत राहील इ. परंतु, या सर्वांच्या मनात आजाराबद्दल भीती असते. तसेच रुग्ण आजाराबद्दल बोलत असताना कोणत्या मुद्द्यावर जास्त बोलत आहे, हे जाणले तर त्या रुग्णाची मुख्य काळजी किंवा चिंता (concern) काय आहे, हे चिकित्सकाच्या बरोबर लक्षात येते. त्यामुळे केंद्रीय अडथळा शोधून काढण्यास मदत होते.


यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आजार सहन करत असताना रुग्णाची जी उत्स्फूर्त प्रतिक्रिया असते ती फार महत्त्वाची असते
. कारण, ती प्रतिक्रिया ही स्वत: रुग्णाची असते व कुठल्याही प्रकारच्या तडजोडीविना ती मनाकडून आलेली असते. ही उत्स्फूर्त प्रतिक्रिया फार महत्त्वाची आहे. कारण, त्यातूनच रुग्णाची मानसिक स्थिती जाणून घेण्यास उपयोग होतो. उदा. वेदनेमुळे एखादा रुग्ण त्याचे डोके किंवा हात भिंतीवर आपटतो किंवा पाय झाडतो.


एका रुग्णाने सांगितले की
, “डॉक्टर हा त्वचारोगमला सहन होत नाही. एखादे तीव्र अ‍ॅसिड आणून ते अंगावर लावावे व त्वचा जाळून टाकावी, अशी इच्छा होते.” यावरून त्या माणसाच्या मनातील वेदना व तिची तीव्रता जाणता येते. तसेच एखादा न शिकलेला किंवा साधा माणूस हा शिकलेल्या माणसापेक्षाजास्त चांगले वर्णन करू शकतो. तो लक्षणे सांगताना कुठल्याही वैद्यकीय संज्ञा वापरत नाही व त्यामुळे डॉक्टरना खरी लक्षणे व चिन्हे जाणणे सोपे जाते.


माणसाची भीती किंवा भय
, एखाद्या गोष्टीबद्दलची विवंचना ही त्याच्या वागण्यातून व कृतीमधून दिसत असते. ती मूळ स्थितीनुसार, लक्षणांनुसार शरीरावर दिसून येते. म्हणून शरीर व मन या दोन्हींचा विचार करणे अत्यंत आवश्यक आहे. याद्वारेच रुग्णाचा आजार हा मुळापासून नष्ट होऊ शकतो.


- डॉ. मंदार पाटकर 

(लेखक एम.डी होमियोपॅथी आहेत.)

9869062276

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@