हॅवमोरचा कुलेस्ट समर जॉब...ओ...माय...गॉड...!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-May-2019
Total Views |

 

सध्या उन्हाळ्याच्या सुट्टीचे वारे वाहू लागले आहेत...सबमिशन, परीक्षा, मार्क्स कसलंच टेन्शन नाही...पण आता काही जण १२ वी नंतर काय करायचं किंवा ग्रॅज्युएशन नंतर आता पुढे काय अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधात असतील. विनीत आणि कला हे असेच दोन मित्र आहेत ज्यांना आता प्रश्न पडलाय. विनीत बारावीमध्ये बोर्डात आलाय आणि कलाचं आताच ग्रॅज्युएशन पूर्ण झालंय.
 

विनीत - हाय कला, मला तुला काहीतरी सांगायचं आहे.

कला - हाय विनीत, मला सुद्धा तुला काहीतरी सांगायचंय. पण आधी तू सांग.

विनीत - मी आमच्या कॉलेजमध्ये पहिला आलो....आणि बोर्डात १० वा.

कला- वा..!!!! अभिनंदन. खूपच मस्त बातमी दिलीस. आता मी जे सांगणारे ते ऐकल्यावर तर, तू अजूनच खुश होशील. मला एका भारी 'समर जॉब' विषयी तुला सांगायचं आहे. हॅवमोर आईस्क्रिम आहे ना...त्यांच्यातर्फे एक कॉन्टेस्ट आयोजित करण्यात आलाय. आणि तुला तर आईस्क्रिम खूप आवडतं...त्यामुळे तू यामध्ये नक्की सहभागी व्हावं असं मला वाटतंय.

विनीत- (टायपिंग) ...वाव...आईस्क्रीम...!!! आणि ते पण यामध्ये जॉब...किती भारी. मला अजून सांग ना या जॉबबद्दल.

कला- ओके. मग मग हे बघ,

 

हॅवमोरच्या 'कुलेस्ट समर जॉब' या कॅम्पेनचा हा तिसरा सिझन आहे. कॉन्टेस्ट तशी ८ एप्रिल ला सुरु झाली आहे आणि २५ मेला संपणार आहे. यामध्ये आपल्याला आईस्क्रिम बनवतानाचा एक व्हिडिओ हॅवमोर आईस्क्रिमच्या वेबसाईटवर जाऊन अपलोड करायचाय. त्यानंतर परीक्षकांच्या नियमानुसार त्यातील काही उत्तम सहभागी व्यक्तींची निवड करण्यात येईल. त्यांना भारतातील यंगेस्ट शेफ म्हणून ओळखल्या गेलेल्या सारांश गोएला यांच्याकडून प्रशिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. आणि हॅवमोरच्या अहमदाबाद मधील आईस्क्रिम फॅक्टरीमध्ये तीन दिवस काम करायचा अनुभव घेता येणार आहे. आणि विशेष म्हणजे या तीन दिवसांच्या जॉबचे तुम्हाला ५० हजार रुपये मिळणार आहेत.

विनीत- मला तर हे ऐकूनच मस्त वाटतंय. प्रशिक्षण आणि ते पण सारांश गोएला यांच्याकडून...!! माझं बऱ्याच दिवसांपासूनचं स्वप्न आहे असा काहीतरी मस्त जॉब करायला मिळावा.

कला - हो ना...!! आणि सगळ्यात भारी काय आहे माहित्ये का?? यामध्ये ज्यांची निवड होईल त्यांना 'चीफ टेस्टिंग ऑफिसर' असा अवॊर्ड पण मिळणार आहे आणि एवढंच नाही तर त्यांनी इन्व्हेन्ट केलेले आईस्क्रिमचे फ्लर्वर्स हॅवमोरच्या भारतातील सगळ्या स्टोअर्समध्ये ठेवण्यात येतील.

विनीत - बास..! आता तर मी आजच या कॉन्टेस्टसाठी अर्ज भरणारे. आणि विराज ला पण सांगतो त्याला सुद्धा खूप आवडेल की संकल्पना. 

कला - ग्रेट..आणि जर तुला अजून काही माहिती हवी असेल तर Havmor coolest summer job या लिंकवर तुला सगळी माहिती मिळेल. आणि मग मला हॅवमोरमधेच पार्टी दे.

विनीत - हो नक्की...बाय आणि धन्यवाद या कुलेस्ट समर जॉबची माहिती दिल्याबद्दल.

तर या Coolest Summer Job बद्दल तुमची देखील उत्सुकता वाढली असेल ना..! तर नक्की या संधीचा विचार करा.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@