कान्स चित्रपट महोत्सवात आता भारतीय चित्रपटांना मानाचे स्थान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-May-2019
Total Views |

 

कान्स हा जगातील सर्वात मोठा चित्रपट महोत्सव म्हणून ओळखला जातो. यावर्षी हा महोत्सव उद्यापासून २५ मे पर्यंत चालणार आहे. या वर्षीच्या महोत्त्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यांदाच या महोत्सवामध्ये भारताचा पॅव्हेलियन पाहायला मिळणार आहे. या पॅव्हेलियनमध्ये भारतीय चित्रपटांचा सुवर्णकाळाचे दर्शन उपस्थित मान्यवर व्यक्तींना घडणार आहे. भारतीय चित्रपटांमधील भाषा, संस्कृती, प्रादेशिकता या मधील विविधता या माध्यमातून जगासमोर खुली होईल. तसेच भारतीय कलाकारांना बाहेरील देशांतील कलाकारांशी विचारांचे आदान-प्रदान करण्यासाठी ही एक हक्काची जागा कान्सच्या माध्यमातून देण्यात आली आहे, ही भारतासाठी आणि भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट ठरेल.

 

भारताच्या माहिती आणि प्रसारण विभागाचे सचिव अमित खरे तर त्यांच्याबरोबर अध्यक्ष प्रसून जोशी, राहुल रावेल, मधूर भांडारकर आणि शाजी एन. करुण हे मान्यवर यावर्षीच्या महोत्सवात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

या वर्षीच्या कान्स महोत्सवामध्ये आगामी वर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाविषयी माहिती देण्यात येणार असून या महोत्सवाच्या अधिकृत पोस्टरचे अनावरण देखील या महोत्सवादरम्यान करण्यात येणार आहे.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@