चेन्नईला धूळ चारत मुंबई बनली आयपीएलचा राजा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-May-2019
Total Views |


 


हैद्राबाद : आयपीएलच्या १२ व्या हंगामात मुंबई इंडियन्सने इतिहास रचलाय. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या थरारामध्ये मुंबई इंडियन्सने चेन्नईला धूळ चारत चौथ्यांदा विजेतेपदकाला गवसणी घातली. हैदराबादच्या राजीव गांधी अंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगलेला हा सामना फुल पैसा वसूल झाला असेच म्हणावे लागेल. कारण विजेतेपदकाला गवसणी घालण्यासाठी दोन्हीही संघाचा शेवटच्या चेंडूपर्यंत संघर्ष चालू होता.


 

मुंबईने दिलेल्या १४९ धावांचा पाठलाग करताना चेन्नईच्या संघाला १४८ धावांपर्यंत मजल मारता आली. शेवटच्या चेंडूवर लसिथ मलिंगाने शार्दूल ठाकूरला पायचीत करत मुंबईने एका धावेने सामना जिंकला. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली. मात्र मुंबई इंडियन्सची सुरुवात अतिशय खराब झाली. पण कायरान पोलार्डच्या नाबाद ४१ धावांच्या बदल्यात मुंबईने आठ बाद १४९ धावा रचल्या. प्रतिउत्तरात चेन्नईला ७ बाद १४८ धावा करता आल्या. यात सर्वाधिक शेन वॅटसनने ८० धावा फाटकावल्या.

 

मुंबईच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत चेन्नईकडून विजय हिसकावून आणला. जसप्रीत बुमरा व राहुल चहरने भेदक गोलंदाजी करत चेन्नईच्या फलंदाजांना खिळवून ठेवले. याच कामगिरीच्या जोरावर जसप्रीत बुमराला सामानावीराचा पुरस्कार देण्यात आला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@