पुन्हा एकदा मुंबई-चेन्नई 'महामुकाबला'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-May-2019
Total Views |


 


मुंबई : चेन्नईने दिल्ली विरुद्ध सामना जिंकून आठव्यांदा आयपीएलच्या अंतिम सामन्यात पोहचला आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी ३ वेळा विजेतेपद पटकावले आहे. दोघांकडे जेतेपदाचा 'चौकार' मारण्याची संधी आहे. आता यावेळी कोण बाजी मारते, याची उत्सुकता लागली आहे. विशेष म्हणजे, मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स ३ वेळा आयपीएल फायनलमध्ये आमने सामने आले आहेत. यामध्ये २ वेळा मुंबईने तर एकदा चेन्नईने विजय मिळवला आहे.

 

रोहित शर्मा विरुद्ध महेंद्र सिंग धोनी...

 

रोहित शर्मा आणि महेंद्र सिंग धोनी हे अनुक्रमे मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स चे कर्णधार असताना ३ वेळा आयपीएल अंतिम सामन्यांमध्ये एकमेकांसमोर आले आहेत. तिन्हीवेळा रोहित शर्माने धोनीवर मात केली आहे.

 

मुंबईचे आकडे चेन्नईवर भारी...

 

मुंबईच्या संघाने २०१३, २०१५, २०१७ अशा तीन संघात विजेतेपद मिळाले आहे. त्यानंतर यंदा मुंबईच्या संघाने अंतिम सामन्यात धडक मारली आहे. एवढचे नाही तर मुंबईच्या संघाचा अंतिम सामन्यात चांगला रेकॉर्ड आहे. मुंबईचा संघ एकूण ४ वेळा अंतिम सामन्यात पोहचला आहे. त्यात ३वेळा त्यांनी विजेतेपद मिळवले आहे. तर, चेन्नईने २००८, २०१०, २०११, २०१२, २०१३, २०१५ आणि २०१८मध्ये अंतिम सामन्यांमध्ये धडक मारली आहे. पण या संघाने केवळ तीन वेळा विजेतेपद मिळवले आहे. 

 

आयपीएलमधला सर्वात मोठा सामना म्हणजे मुंबई आणि चेन्नई यांच्यातला. दरम्यान, या द्वंद्व युध्दात मुंबईचे प्रदर्शन जास्त चांगले आहे. दोन्ही संघांनी एकूण २७ सामने खेळले आहेत. यात मुंबईने १६ तर चेन्नईने ११ वेळा सामना जिंकला आहे. विशेष म्हणजे चेन्नईमध्ये खेळणार आताचे तीन खेळाडू हे पूर्वी मुंबईतूनदेखील खेळले आहेत.

 

'हे' खेळाडू दोन्ही संघाकडून खेळले आहेत

 

ड्वेन ब्राव्हो : सध्या चेन्नई संघातील हुकमाचा एक्का असलेला द्वैत ब्रावो हा २००८ ते २०१०मध्ये मुंबई संघाचे प्रतिनिधित्व करत होता. त्यामुळे ड्वेन ब्रावोची मुंबई विरुद्ध काय रणनीती असेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

 

हरभजन सिंग : एकेकाळी मुंबई संघाचा ट्रम्प कार्ड असलेला टर्बेनेटर सध्या चेन्नई संघाकडून खेळताना अप्लयक फिरकीची जादू दाखवत आहे. २००८ ते २०१७ एवढ्या मोठ्या कालावधीनंतर चेन्नईने हरभजन सिंगला आपल्यात ताफ्यात शामिल करून घेतले. त्यामुळे त्याचा उपयोग धोनी कसा करून घेतो याकडे सर्वांचे लक्ष असेल.

 

अंबाती रायुडू : सध्या चेन्नईकडून खेळताना आंबटी रायुडूच्या खेळीवरदेखील सगळ्यांचे लक्ष राहिले आहे. मधल्या फळीतील त्याचा समावेश हा चेन्नई संघासाठी फायदा ठरतो आहे. विशेष म्हणजे अंबाती रायुडूदेखील २०१० ते २०१७ ही ७ वर्ष मुंबई इंडियन्सकडून खेळला आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@