स्वप्नील जोशीच्या ‘मोगरा फुलला’मधील ‘मनमोहिनी’ हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-May-2019
Total Views |


 

‘जीसिम्स’ निर्मित आणि श्रावणी देवधर दिग्दर्शित ‘मोगरा फुलला’हा चित्रपट येत्या १४ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून तरुणाईचा लाडका गायक रोहित राऊत याने संगीतबद्ध केलेले व गायलेले मोगरा फुलला’ मधील 'मनमोहिनी' हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे आणि या गाण्याला प्रेक्षकांचा देखील भरघोस प्रतिसाद मिळत आहे.


 

प्रत्येक माणसाच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती असते जिला पाहिल्यावर ती आपली 'मनमोहिनी' आहे असे वाटते, असच काहीसे दर्शविणारे 'मनमोहिनी' हे रोमँटिक गाणे नुकतेच सोशल मीडियावरून प्रदर्शित करण्यात आले आहे. या गाण्यामध्ये स्वप्नील जोशी बरोबर सई देवधर हा नवोदित चेहरा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘मनमोहिनी’ या गाण्यामधून चित्रपटामध्ये सई देवधर ही स्वप्नील जोशीची मनमोहिनी आहे असे दिसत असून या गाण्यातून या सुंदर जोडीचा उत्तम अभिनय आणि त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या गाण्याची शब्दरचना अभिषेक कणखर यांची असून फुलवा खामकर यांनी या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केले आहे.


या चित्रपटामध्ये स्वप्नील जोशी आणि सई देवधर यांच्याबरोबर चंद्रकांत कुलकर्णी, संदिप पाठक, नीना कुळकर्णी, सुहिता थत्ते, समिधा गुरु, विघ्नेश जोशी, संयोगिता भावे, दीप्ती भागवत, प्राची जोशी, सानवी रत्नालीकर, आनंद इंगळे, आशिष गोखले, प्रसाद लिमये, हर्षा गुप्ते, सोनम निशाणदार, सिद्धीरूपा करमरकर, माधुरी भारती, सुप्रीत कदम, अनुराधा राजाध्यक्ष आणि आदित्य देशमुख या आघाडीच्या कलाकारांच्याही भूमिका आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@