या वेब सिरीज नक्की पहा...!!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-May-2019
Total Views |

 


नेटफ्लिक्स आणि अमेझॉन प्राईम यावरील वेब सिरीज सध्या लोकांमध्ये चर्चेत आहेत. सर्जनशीलता असणे ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ती प्रत्येकामध्येच कमी अधिक प्रमाणात असते फक्त ती व्यक्त करण्याचे प्रत्येकाचे माध्यम वेगळे असू शकते. एखादी छोटीशी गोष्ट सुद्धा समोरच्या व्यक्तीने आपल्याला समजावली तर आपल्याला किती सुखावल्यासारखे वाटते तसेच काहीसे या वेब सिरीज बघताना आपल्याला वाटत असते. काही वेळा आपल्या रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात मन रामावण्यासाठी
, तर काही वेळा आपल्याला जे सहज बोलता येत नाही ते समोरचा बोलत असेल आणि आपसूकच आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळत असतील तर किती मस्त वाटते म्हणून आपल्याला वेब सिरीज किंवा फिल्म्स बघायला आवडते. म्हणजे यापेक्षाही वेगळी करणे असूच शकतात पण त्यापैकी ही करणे असू शकतात. आता ही सगळी प्रस्तावना करण्याचे कारण म्हणजे २०१९ मध्ये काही नवीन वेब सिरीज आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्याविषयी थोडी माहिती खास तुमच्यासाठी.

१. सेक्रेड गेम्स २ - सरताज म्हणजेच सैफ अली खान आणि गणेश गायतोंडे म्हणजेच नवाझुद्दिन सिद्दीकी यांनी सॅक्रेड गेम्स च्या पहिल्या सीझनमध्ये एकदम कमाल कामगिरी केल्यामुळे ती वेब सिरीज प्रचंड लोकप्रिय झाली. आता याच विक्रम चंद्रा यांच्या पुस्तकावर आधारित वेब सिरींजचा दुसरा सिझन लवकरच आपल्या भेटीस येणार आहे. या नव्या सिरीजमध्ये नवे डावपेच आणि नवीन पात्रे यांच्यासह कहानी मे ट्विस्ट येणार आहे. पहिल्या सिझनला तर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आता येणाऱ्या सिझनबद्दल प्रेक्षकांचे मत लवकरच उघड होईल. ही सिरीज आपल्याला नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे.

 


२. बाहुबली बिफोर द बिगिनिंग - बाहुबली आणि बाहुबली २ या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर अधिराज्य गाजवत ब्लॉकबस्टर चित्रपटाची व्याख्याच बदलून टाकली असे म्हणायला हरकत नाही. साधारणपणे एका चित्रपटाचा पुढील भाग येईल कि नाही याबद्दल आपल्याला अंदाज येतो मात्र या चित्रपटाने तर या समजुतीला देखील मागे टाकत बाहुबलीच्याही आधीची कथा
'बाहुबली द बिगिनिंग' या प्रीक्वलच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या समोर आणायचे ठरवले आहे. त्यामुळे आता या चित्रपटात बाहुबलीच्या आयुष्यातील आणखी काही घडामोडी आपल्याला नेटफ्लिक्सवर बघायला नक्की आवडेल.

 


३. यंग शेल्डन- बाहुबली प्रमाणेच हा देखील एक प्रीक्वल आहे बिग बँग थिअरी या सुप्रसिद्ध सिरीजचा. चक लोरे असे या यंग शेल्डन सीरिजच्या दिग्दर्शकाचे नाव. बिग बँग मधील शेल्डन कूपर या भूमिकेला लोकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. शेल्डन हे अतिशय मजेदार आणि मनोरंजक पात्र आहे. आणि त्यातूनच यंग शेल्डन या पत्राचा जन्म झाला. शेल्डन कूपर या पत्राचेच बालपण या यंग शेल्डनमध्ये चित्रित करण्यात आले आहे. त्याची निरागसता आणि चातुर्य पाहून आपण अवाक होतो. अतिशय कौटुंबिक अशी ही सिरीज असली तरी कोणत्याही वयोगटाच्या व्यक्तीला ही सिरीज आवडू शकते ही कलाकारांची कमाल आहे. ही सिरीज तुम्ही अमेझॉन प्राईमवर पाहू शकता.


 

४. चॉपस्टिक्स - एक प्रतिभावान पण आत्मविश्वास कमी असलेली मुलगी, कथेतील काही घडामोडींमुळे तो हरवलेला आत्मविश्वास तिला कसा परत मिळतो याची कथा म्हणजे 'चॉपस्टिक'. ही सिरीज अश्विनी यार्दी यांनी दिग्दर्शित केली असून ही नेटफ्लिक्स वरील पहिली भारतीय ओरिजिनल सिरीज आहे. या सिरीजमध्ये सोशल मीडिया स्टार मिथिला पालकर आणि आएशा, देव.डी यासारख्या गाजलेल्या चित्रपटात काम केलेला अभय देओल हे एक स्क्रीन शेअर करणार आहेत. येत्या ३१ मे पासून ही सिरीज नेटफ्लिक्सवर पाहायला मिळणार आहे.

 

५. मिर्झापूर २ - गुरुमित सिंह दिग्दर्शित मिर्झापूर २ मध्ये पंकज त्रिपाठी, श्वेता त्रिपाठी, अली फझल, रसिका डुगल अशी जबरदस्त स्टारकास्ट आहे. मिर्झापूरच्या पहिल्या सिझनला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. या मिर्झापूर शहरात हिंसा हा जणू काही त्यांच्यासाठी जगण्याचा एक मार्गच आहे असे वाटते. सतत संघर्ष आणि आपले अस्तित्व जपण्याची धडपड सुरु असताना दिसते. आणि याच अस्तित्वाची लढाई मिर्झापूरमध्ये दाखवण्यात आली आहे. अमेझॉन प्राईमची ही ओरिजिनल सिरीज आहे.

 

या आणि अशा अनेक नवीन सिरीज आपण नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम, हॉटस्टार यांसारख्या माध्यमातून पाहत असता. या डिजिटल युगात या वेब सिरीज सुद्धा माहितीचा एक स्रोत आहेत आणि प्रत्येक नवीन कथा नवीन अनुभव घेऊन येत राहतील यात शंका नाही मात्र या काही वेब सिरीज तुम्ही नक्की पहा.

- सायली करमरकर  
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@