पतंजलिचा परदेशी कंपन्यांना झटका : विदेशी कंपन्यांना नुकसान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-May-2019
Total Views |




नवी दिल्ली : पतंजलि आयुर्वेद या योगगुरु बाबा रामदेव यांच्या कंपनीने पुन्हा एकदा बहुराष्ट्रीय कंपन्यांना झटका देत आपल्या प्रगतीचा चढता आलेख कायम ठेवला आहे. पतंजलि आयुर्वेदच्या स्पर्धेमुळे टुथपेस्ट कंपन्यांना मोठा तोटा सहन करावा लागला आहे.

 

पतंजलि दंतकांतीची मागणी वाढली

पतंजलिचे उत्पादन असलेल्या दंतकांतीची मागणी वाढली आहे. ३१ मार्च रोजी समाप्त झालेल्या आर्थिक वर्षात कोलगेटचा बाजारातील हिस्सा २१० अंकांनी कमी झाला आहे, आता तो केवळ ४९.४ टक्के इतकाच राहीला आहे. कोलगेटची प्रमुख उत्पादने असलेल्या कोलगेट डेंटल क्रिम, सिबाका, एक्टीव्ह सॉल्ट आदींची विक्री घटल्याने कोलगेटला मोठा फटका बसला आहे. पतंजलि दंतकांतिच्या विक्रीत वाढ झाल्याचा परिणाम कोलगेटवर दिसून येत आहे.

 

५० अंकानी टुथपेस्ट क्षेत्रात पतंजलिची वाढ १

एका अहवालानुसार, या बाजारपेठेतील वाढ दीडशे अंकांनी झाली आहे. ओरल केअर क्षेत्रात भारतातील एकेकाळी प्रमुख हिस्सा असलेली कोलगेट आणि पामोलीव्ह ही कंपनी कोलगेटची उत्पादने तयार करत असून तीचे मुख्यालय अमेरिकेत आहे.

 

'डाबर'लाही फायदा

पतंजलि आयुर्वेदची प्रमुख प्रतिस्पर्धी असलेली कंपनी हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडनेही ओरल सेक्टरमधील आपली हिस्सेदारी गमावली आहे. निल्सनच्या डाटानुसार, एचयुएलच्या विक्री हिश्श्यामध्ये ८० अंकांनी घसरण नोंदवण्यात आली आहे. आता एचयुएलचा हिस्सा केवळ १६.४ टक्क्यांवर राहीला आहे. याच काळात ५० अंकांनी वाढ करत डाबरने बाजारात १३ टक्के हिस्सा मिळवला आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@