मायावतींचे वादग्रस्त ट्विट : मोदी ओबीसी असते तर संघाने पंतप्रधान केले नसते

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-May-2019
Total Views |




लखनऊ : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील मतदान जवळ आल्याने प्रचाराचा तोफा आज थंडावणार आहेत. मात्र, पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे सुरू आहेत. या दरम्यान, उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांची जीभ घसरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जातीचा उल्लेख करत मायावतींनी टीका केली आहे.

 

"मोदी राजकीय स्वार्थासाठी ओबीसी असल्याचा दावा करत आहेत. मोदी ओबीसी असते तर रा. स्व. संघाने त्यांना पंतप्रधान केले नसते, असे ट्विट मायावतींनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महागठबंधनतर्फे केल्या जाणाऱ्या जातीयवादी राजकारणाचा समाचार घेण्यात आल्यानंतर मायावतींना टीका सहन न झाल्याने वादग्रस्त विधान केले आहे. "तुम्ही जन्माने ओबीसी नाही आहात म्हणून तुम्हाला देशातील जातीवादाचा दंश झेलावा लागला नाही तुम्ही स्वतःला मागासवर्गीय म्हणत आहात. तुम्ही जर मागासवर्गीय असता तर रा.स्व.संघाने पंतप्रधान केलं नसतं", असे ट्विट मायावतींनी केले आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@