भिवंडीत वज्रेश्वरी मंदिरावर दरोडा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-May-2019
Total Views |



भिवंडी : भिवंडीतील वज्रेश्वरी देवी मंदिरात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास दरोडा पडल्याची घटना उघडकीस आली आहे. दरोडेखोरांनी मंदिरातील सुरक्षारक्षकांना बांधून ठेवून दानपेट्या फोडून त्यातील मुद्देमाल घेऊन पसार झाल्याचे सांगितले जात आहे.

या प्रकरणी मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या वज्रेश्वरी देवी मंदिरात आज पहाटे दरोडेखोर घुसले. त्यांनी तेथील सुरक्षारक्षकांना बांधून ठेवले. त्यानंतर मंदिरातील दानपेट्या फोडल्या. किमान १० ते १५ दरोडेखोर होते, अशी माहिती देवी संस्थानच्या एका सदस्याने दिली.

 

स्थानिक गुन्हे शाखेकडून दरोडेखोरांचा शोध घेण्यात येत आहे. मंदिरातून किती मुद्देमाल चोरीला गेला हे अद्याप समजू शकलं नाही. दरम्यान, मंदिरावरील दरोड्याच्या घटनेच्या निषेधार्थ वज्रेश्वरी गावातील नागरिकांनी बंद पाळला आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@