...यांच्याकडील दुर्मिळ संग्रह राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या खजिन्यात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-May-2019
Total Views |

 


सुप्रसिद्ध दिग्दर्शक ऋत्विक घटक यांचे निकटचे सहकारी महेंद्र कुमार यांच्या वैयक्तिक संग्रहालयातील फिल्म्स आणि चित्रपटविषयक इतर साहित्याचा फार मोठा खजिना पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला प्राप्त झाला आहे.
'स्टील फोटोग्राफर' म्हणून प्रसिद्ध असलेले महेंद्र कुमार यांनी अनेक वर्षे दिग्दर्शक ऋत्विक घटक यांच्याकडे असिस्टंट कॅमेरामन म्हणून काम केले होते. त्यांच्या वैयक्तिक संग्रहालयात सेल्युलाइड फिल्म्सची रिळे, ३५ एमएम कलर्स पॉजिटीव्ह स्लाईड्स, कृष्णधवल निगेटिव्हच्या स्ट्रीप्स, पोस्टर्स, कॅमेरे, फिल्म्स रोल्स, तसेच असंख्य सीडी, डीव्हीडी, हस्तलिखिते, पुस्तके, जर्नल्स आणि इतर चित्रपटविषयक दुर्मिळ साहित्य मोठ्या प्रमाणावर होते. कोलकाता येथील 'सेंटर फॉर स्टडीज इन सोशल सायन्सेस' या ठिकाणी असलेले हे सर्व साहित्य चांगले जतन होण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे हस्तांतरीत करण्यात आले आहे.

या दुर्मिळ संग्रहात सुमारे सोळाशेहून अधिक छायाचित्रे, २३०० कलर पॉजिटीव्ह स्लाईड फिल्म्स, ३५० निगेटिव्ह फिल्म्सच्या स्ट्रीप्स तसेच असंख्य फिल्म्स रिळे आहेत. तसेच १९३० मधील दुर्मिळ छायाचित्रे आहेत. महेंद्र कुमार यांनी त्यांच्या कॅमेऱ्यातून काढलेली, सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक उदय शंकर आणि त्यांच्या नृत्य पथकातील काही दुर्मिळ नृत्याची छायाचित्रेही त्यामध्ये आहेत. तसेच ऋत्विक घटक यांच्या 'नागरिक', 'सुवर्णरेखा', आणि 'टिटास एकटी नादीर नाम' या चित्रपटातील काही दुर्मिळ छायाचित्रेही या संग्रहात आहेत.

 

प. बंगालच्या चित्रपट संग्रहालयाकडून तीन वर्षांपूर्वीच राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला ऋत्विक घटक यांचे अपूर्णावस्थेत असलेले 'काटो अजनारे' (१९५९), 'बांगर बंग दर्शन' (१९६४), 'रंगेर गुलाम' (१९६८)हे तीन चित्रपट प्राप्त झाले आहेत. याशिवाय ऋत्विक घटक यांचे 'अजात्रिक' (१९५८) 'बरी ठेके पलीये' (१९५९), 'मेघे ढाका तारा' (१९६०), 'कोमल गांधार' (१९६१), 'सुवर्णरेखा' (१९६२), 'जूकटी टाक्को आर गप्पो' (१९६३) हे सहा चित्रपट राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने संवर्धन करून ठेवले आहेत.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@