शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-May-2019
Total Views |


 


मुंबई : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वर्तमानपत्राचा आजचा अग्रलेख सध्या वेगळ्याच कारणाने चर्चिला जात आहे. सामनाच्या आजच्या अग्रलेखातून श्रीलंकेतील बुरखा बंदीवरून 'रावणाच्या लंकेत घडले; रामाच्या अयोध्येत कधी घडणार? असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारण्यात आला. मात्र, हा सवाल जवाबचा बाण शिवसेनेलाच रुततो की काय? अशा चर्चाना उधाण आले आहे. याला कारण म्हणजे, शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या अग्रलेखावरूनची भूमिका जाहीरपणे मांडली. दै. सामनाच्या आजच्या अग्रलेखामधील भुमिका ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नसल्याचे गोऱ्हे म्हणाल्या. त्यामुळे शिवसेनेमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे समोर आले आहे.

 

'सामना'च्या अग्रलेखातील भूमिका शिवसेनेची अधिकृत भूमिका नसल्याचे गोऱ्हे यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून जाहीर केले. यावेळी गोऱ्हे म्हणाल्या, "शिवसेना पक्षाच्या भूमिका या नेत्यांच्या बैठकीतुन ठरत असतात. पक्षप्रमुख ऊद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार त्या अंतीमत: ठरतात. आजची दै. सामनाच्या संपादकीयातील भुमिका ना चर्चेतुन आली ना आदेशातुन. त्यामुळे कदाचित चालु घडामोडींवर संपादकांचे हे वैयक्तिक मत असेल. मात्र, ही शिवसेना पक्षाची अधिकृत भुमिका नाही."

 

दै. सामना हे शिवसेना पक्षाचे अधिकृत मुखपत्र आहे. शिवसेना आणि सामनाने वेगवेगळी राजकीय भूमिका घेतल्याचे आजतागायत कधीही घडले नव्हते. असे असताना आज नेमके काय घडले की पक्ष प्रवक्त्या डॉ. नीलम गोऱ्हे आणि नेते संजय राऊत यांच्यामधील विसंवाद जाहीरपणे माध्यमांसमोर आला, याची खुमासदार चर्चा राज्यातील राजकीय वर्तुळात सध्या सुरु आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@