मर्दानी २ चे नवीन पोस्टर प्रदर्शित

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-May-2019
Total Views |



मर्दानी २ चे नवीन पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. राणी मुखर्जी बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर आपली मर्दानगी सिद्ध करणार आहे. 'मर्दानी' मधील राणी मुखर्जीच्या अभिनयाचे सर्वांनीच कौतुक केले होते. आता मर्दानी २ ला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.


आदित्य रॉय कपूर निर्मित मर्दानी २ च्या माध्यमातून मर्दानीच्या पहिल्या भागाचा लेखक, दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहे. 'मर्दानी २' मध्ये राणी मुखर्जी एका पोलीस अधीक्षकाची भूमिका साकारणार असून एका २१ वर्षाच्या निर्दयी खलनायकाशी तिचा सामना असणार आहे. येत्या आठवड्यात चित्रपटातील एका भागाचे चित्रीकरण राजस्थान मध्ये होणार आहे.

यश राज फिल्म्स लवकरच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करणार आहेत. मात्र त्या आधी आपल्याला अशाच काही छोट्या गोष्टी नक्कीच पाहायला मिळतील. आणि चित्रपटाबद्दल उत्सुकता अधिक वाढेल.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@