चॉपस्टिक्स - ३१ मे पासून नेटफ्लिक्सवर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-May-2019
Total Views |


 

'चॉपस्टिक' नावाची नवीन वेब सिरीज या महिन्याच्या अखेरी म्हणजेच ३१ मे पासून नेटफ्लिक्स ओरिजिनलवर सुरु होणार आहे. या सिरीजमध्ये सोशल मीडिया स्टार मिथिला पालकर आणि आएशा, देव.डी यासारख्या गाजलेल्या चित्रपटात काम केलेला अभय देओल हे एक स्क्रीन शेअर करणार आहेत. सध्या मोठ्या पडद्यावरचे कलाकार देखील डिजिटल माध्यमांकडे झुकताना दिसत आहेत.


एक प्रतिभावान पण आत्मविश्वास कमी असलेली मुलगी, कथेतील काही घडामोडींमुळे तो हरवलेला आत्मविश्वास तिला कसा परत मिळतो याची कथा म्हणजे 'चॉपस्टिक'. ही सिरीज अश्विनी यार्दी यांनी दिग्दर्शित केली असून ही नेटफ्लिक्स वरील पहिली भारतीय ओरिजिनल सिरीज आहे. या सीरिजच्या प्रदर्शनाच्या तारखेबरोबरच या सिरींजची एक झलक देखील प्रेक्षकांसाठी प्रकाशित करण्यात आली आहे.
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@