'चाशनी' हे 'भारत' चित्रपटातील नवीन गाणे प्रदर्शित

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-May-2019
Total Views |



'भारत' या चित्रपटातील एक नवीन गाणे आज प्रदर्शित झाले.
'चाशनी' हे नवीन गाणे नावाप्रमाणेच सुमधुर आवाज असलेल्या अभिजत श्रीवास्तव यांनी गेले आहे तर विशाल आणि शेखर यांनी संगीतबद्ध केले आहे. सलमान खान आणि कतरीना यांच्यावर चित्रित चाशनी या गाण्याची कोरिओग्राफी वैभवी मर्चंटने केली आहे तर गाण्याचे शब्द इर्शाद कामिल यांनी लिहिले आहेत. सलमान आणि कतरिनाच्या या रोमँटिक गाण्याला प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे.

 

 
 

अली अब्बास जफर दिग्दर्शित भारत या चित्रपटातील हे गाणे आज प्रदर्शित झाले. या आधी चित्रपटाची वेगवेगळी पोस्टर्स, पहिल्यांदाच प्रदर्शित झालेले मोशन पोस्टर तसेच टीझर्स या आधी प्रदर्शित करण्यात आले आहेत. मात्र या गाण्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वृद्धिंगत झाली आहे. सलमान खान आणि कतरीना कैफ यांची जोडी कायमच प्रेक्षांना आवडते. त्यामुळे येत्या ५ जूनला चित्रपटगृहात 'भारत' हा चित्रपट बघण्यासाठी किती गर्दी होते हे लवकरच कळेल.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@