धक्कादायक : राज्यातील जलसाठा झाला कमी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-May-2019
Total Views |



मुंबई : राज्यातील मोठ्या धरणांमध्ये सध्या १७.६९ टक्के पाणीसाठा असून, गेल्यावर्षी तो ३३.४६ इतका होता. तर, मध्यम प्रकल्पांमध्ये गेल्या वर्षी या काळात ३३.१३ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. तो आता २८.९२ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे राज्यात पाणी कपातीला सामोरे जावे लागू शकते असे सांगण्यात आले आहे.

 

औरंगाबादच्या धरणांमध्ये सध्या २.७३ % पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी तो ३२.५४ इतका होता. नाशिक विभागात सध्या १६.२ % पाणीसाठा असून, गेल्या वर्षी तो ३५.८९ इतका होता. नागपूर विभागात सध्या ८.६७ % इतका पाणीसाठा असून, तो गेल्या वर्षी १६.८२ इतका होता. कोकणात गेल्यावर्षी ४८.७८ टक्के पाणीसाठा होता, यंदा तेथे केवळ ३६.५८ % पाणी आहे.

 

मुबलक पाणी उपलब्ध असलेल्या कोकणातही पाणी टंचाईचे संकट निर्माण झाले आहे. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर याचार जिल्ह्यांमध्ये ७५७ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. मे महिन्यामध्ये ही संख्या दीड ते दोन हजारांवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@