माध्यमांना एक्झिट पोल जाहीर करण्यास मनाई

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Apr-2019
Total Views |



निवडणूक काळात एक्झिट पोल व ओपीनिअन पोलवर प्रतिबंध


मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या मतदान कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारचे एक्झिट पोल जाहीर करण्यास व मतदान संपण्याच्या वेळेपूर्वी ४८ तासाच्या कालावधीत कोणत्याही प्रकारचे जनमत चाचण्याचे अंदाज जाहीर करण्यास निवडणूक आयोगाने मनाई केली आहे. याबाबतचे परिपत्रक आयोगाने जारी केले आहे.

 

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशी म्हणजे ११ एप्रिल २०१९ रोजी सकाळी ७ ते शेवटच्या टप्प्यातील मतदानच्या दिवशी दि. १९ मे २०१९ रोजी सायं. ६.३०वाजेपर्यंत या पूर्ण कालावधीत कोणत्याही प्रकारच्या मतदानोत्तर अंदाज चाचण्यांचे सर्वेक्षण किंवा करण्यास माध्यमांवर बंदी घातली आहे.

 

याशिवाय मतदारसंघांमध्ये मतदानाच्या समाप्तीच्या वेळेआधी ४८ तास कोणत्याही जनमत चाचणीचे अंदाज किंवा अन्य कोणत्याही निवडणूक सर्वेक्षणाचे अंदाज इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रसिद्ध करता येणार नाहीत, असेही निवडणूक आयोगामार्फत सूचीत करण्यात आले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@