महाराष्ट्र क्रांती सेनेचा महायुतीला पाठिंबा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Apr-2019
Total Views |


 


मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यातून तयार झालेल्या महाराष्ट्र क्रांती सेने भाजपाप्रणित महायुतीला आपला पाठिंबा जाहीर केला. शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या उपस्थितीत रविवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथील औपचारिक कार्यक्रमात क्रांती सेनेने आपण महायुतीला पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले.

 

भाजप सरकारने मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिले आहे. न्यायालयाकडून या निर्णयावर अद्याप स्थगिती आली नसल्याने आरक्षण टिकणार असल्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच आम्ही महायुतीला पाठिंबा जाहीर करत आहोत असे क्रांतिसेनेने सांगितले. दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण ही संघटनेची प्रमुख मागणी होती. यासाठी ही संघटना राज्यात १५ लोकसभेच्या जागांवर निवडणूक लढवणार होती.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@