दहशतवादी हल्ल्यात संघाच्या प्रांत सह सेवा प्रमुखाचा मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Apr-2019
Total Views |



जम्मू-काश्मीर : रा. स्व. संघाचे स्वयंसेवक चंद्रकांत शर्मा यांचा दहशतवादी हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास किश्तवाड येथील जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. यात त्यांचा सुरक्षा रक्षक राजेंद्र कुमार याचा जागीच मृत्यू झाला होता तर या हल्ल्यात शर्मा जखमी झाले होते. त्यांच्यावर जम्मू येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते.

 

चंद्रकांत शर्मा हे रा. स्व. संघाचे प्रांत सह सेवा प्रमुख होते. तर किश्तवाड येथील जिल्हा रुग्णालयात ते मेडिकल असिस्टंट म्हणून काम करत होते. मिळालेल्या माहितीनुसार, शर्मा हे रुग्णालयात असताना काही दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात त्यांच्या सुरक्षा रक्षकाचा जागीच मृत्यू झाला होता. तर शर्मा हे किरकोळ जखमी झाले होते. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र शर्मा यांना वाचविण्यात यश आले नसून यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

 

शर्मा हे लहानपणापासून संघाशी जोडले गेले होते. त्यांनी जिल्हा, विभाग कार्यवाह व प्रांत सह सेवा प्रमुख म्हणून काम पाहिले आहे. दहशतवादाखाली असलेल्या स्थानिक नागरिकांचे मनोबल उंचावण्याचे कठीण काम त्यांनी पार पाडले होते. याशिवाय किश्तवाड येथील हिंदूंना संघटित करण्यात व जवानांना सहकार्य करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. दरम्यान, घटनेनंतर परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आली असून, सुरक्षा रक्षकांनी सर्च ऑपरेशन चालू केले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@