संघाच्या स्वयंसेवकांवर गोळीबार; एकाचा मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Apr-2019
Total Views |



 


जम्मू-काश्मीर : येथील किश्तवारमध्ये रा. स्व. संघाच्या एका स्वयंसेवकांवर आतंकी हल्ला करण्यात आला आहे. चंद्रकांत शर्मा असे या स्वयंसेवकांचे नाव असून ते किश्तवार येथील जिल्हा रुग्णालयातील मेडिकल असिस्टंट म्हणून काम करत होते. मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास किश्तवार जिल्हा रुग्णालयात ही घटना घडली यात शर्मा यांच्या सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, शर्मा हे रुग्णालयात असताना काही दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात त्यांच्या सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला आहे. तर शर्मा हे किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, घटनेनंतर परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आली असून, सुरक्षा रक्षकांनी सर्च ऑपरेशन चालू केले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@