नक्षली हल्ला : भाजप आमदार भीमा मंडवी ठार, चार जवान शहीद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Apr-2019
Total Views |





रायपूर : देशभरात लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून मंगळवारी नक्षलवाद्यांनी एक मोठा हल्ला घडवून आणला. छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त दांतोवाडा भागातील भाजप आमदार भीमा मंडवी यांच्या ताफ्याला लक्ष्य करत नक्षलवाद्यांनी हा हल्ला घडवून आणला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला ४८ तास उरले असतानाच छत्तीसगच्या दंतेवाडा येथे भाजप आमदार भीमा मंडावी यांच्या ताफ्यावर नक्षलवाद्यांनी हल्ला चढवला असून या हल्ल्यात मंडावी यांचा जागीच मृत्यू तर ४ जवान शहीद आहेत.


 
 
 

आमदार मंडवी यांच्या ताफ्यावर आयईडीद्वारे हल्ला घडवला आहे. याच पाच जवान गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, भाजपा आमदार भीमा मंडवी हे सभा संपवून येत असताना त्यांच्या ताफ्याला लक्ष्य करून नक्षलवाद्यांनी स्फोट घडवून आणला. स्फोटात आमदार मंडवी यांच्या ताफ्यात असलेल्या सुरक्षा दलाच्या वाहनाची हानी होऊन छत्तीसगड पोलीस दलाचे पाच जवान गंभीर जखमी झाले आहेत.


 
 


संघाकडून निषेध

चंद्रकांत यांच्या हत्येचा रा. स्व. संघाकडून तीव्र निषेध करण्यात आला आहे. मारेकर्‍यांना तातडीने अटक केली जावी, अशी मागणी प्रांत संघचालक ब्रिगेडियर सुचेत सिंह यांनी केली आहे.

 

आज अंत्यसंस्कार

चंद्रकांत शर्मा यांचे पार्थिव जम्मूहून किश्तवाड येथे आणण्यात आले असून, उद्या बुधवारी त्यांच्यावर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. उद्या सकाळपासून त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानी ठेवले जाणार आहे.



माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat





 
@@AUTHORINFO_V1@@