प्रियांका गांधींच्या रॅलीत 'मोदी मोदी' घोषणा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Apr-2019
Total Views |


बिजनौर (उत्तर प्रदेश) : काँग्रेसच्या राजकारणात सक्रिय झालेल्या प्रियंका गांधी यांच्यावर सध्या उत्तर प्रदेशमध्ये पक्षाला गतवैभव प्राप्त करून प्रयत्न करत आहेत. मंगळवारी प्रियंका गांधी उत्तर प्रदेशातील बिजनौर येथे मोठा रोड शो करत होत्या. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांसमोर आलेल्या भाजपा कार्यकर्त्यांनी मोदी-मोदीच्या घोषणा दिल्या. सुरुवातीला पेचात पडलेल्या कॉंग्रेस कार्यकर्ते आणि प्रियांका गांधी यांनी फुलांचा वर्षाव केला.

लोकसभा निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान, प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सर्व मतदारांकडून सुरू आहे. दरम्यान काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी या आज बिजनौर येथील काँग्रेस उमेदवार नसिमुद्दीन सिद्दीकी यांच्या प्रचारार्थ रोड शो करत होत्या. मात्र या रोड शोवेळी काँग्रेस आणि भाजपाचे कार्यकर्ते आमने-सामने आले.

काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आल्यावर एकमेकाविरोधात घोषणा देऊ लागले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी मोदी मोदी असा जयजयकार सुरू केला. कॉंग्रेस समर्थकांनी प्रियांका गांधींच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. यामुळे तणाव निर्माण झाल्याने प्रियांका गांधी यांनी प्रसंगावधान राखत भाजपा कार्यकर्त्यांवर फुलांची उधळण केली.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@