राम मंदिरासाठी आमचे प्रयत्न सुरू : अरुण जेटली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Apr-2019
Total Views |



नवी दिल्ली : लोकसभा निवडणूकीच्या तीन दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या संकल्प पत्रात राम मंदिर उभारणार असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे. यंदाच्या निवडणुकीसाठी भाजपाने आपला सोमवारी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्यात विविध विकास योजनांच्या मुद्यांसह या राम मंदिराचा मुद्दाही मतदारांसह मांडला आहे.

नवी दिल्लीतील भाजपाच्या कार्यालयात सोमवारी 'संकल्प पत्र' प्रसिद्ध करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, अर्थमंत्री अरुण जेटली, संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण आदी मान्यवर नेते उपस्थित होते. भाजपाने सन २०२२ पर्यंत आपल्या संकल्प पत्रातील ७५ संकल्प पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे.

राजनाथ सिंह म्हणाले कि, " सौहार्दपूर्ण वातावरणात लवकरात लवकर राम मंदिर बांधण्यासाठी आपचे प्रयत्न सुरु आहेत. राम मंदिरासाठी सर्व शक्यता तपासल्या जाणार आहेत." सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. न्यायालय घेईल तो निर्णय आम्हाला मान्य असल्याचे यापूर्वी म्हटले होते. त्यामुळे साऱ्यांचे लक्ष या ऐतिहासिक निकालाकडे आहे. त्यामुळे सरकारच्या बाजूने हा निर्णय लागल्यास पुन्हा राम मंदिर उभारू, असा संकल्प भाजपतर्फे करण्यात आला आहे.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@